लखनौ (उत्तर प्रदेश) : एक नवरीने लग्नानंतर काहीच वेळात नवरदेवाचे वय खूप जास्त आहे, असे कारण सांगून नवरीने लग्न मोडल्याची घटना वाराणसीमधील चौब...
लखनौ (उत्तर प्रदेश) : एक नवरीने लग्नानंतर काहीच वेळात नवरदेवाचे वय खूप जास्त आहे, असे कारण सांगून नवरीने लग्न मोडल्याची घटना वाराणसीमधील चौबेपूर येथे घडली आहे.
यानंतर एकच खळबळ उडाली.
कादीपुर खुर्द गावातील चौहान वस्तीमध्ये एक लग्न होते. वाराणसीच्या संकटमोचन परीसरातून गावात वरात आली होती. नवरी नवरदेवाने लग्न झाल्यानंतर सात फेरे घेतले आणि लग्न पार पडले. नवरीची पाठवणीची तयारी सुरू झाली तेव्हा तिने नवरदेवाकडे पाहिले. नवरदेवाचे वय खूप जास्त आहे म्हणून नवरीने नवरदेवासोबत जाण्यास नकार दिला. अखेर प्रकरण चौबेपूर पोलिस ठाण्यात पोहोचले. नवरी आणि नवरदेव दोन्हीकडच्या नातेवाईकांपुढे चर्चा झाली.
पोलिसांना दोन्हीकडील लोकांना आपसात बोलून मार्ग काढण्याचा सल्ला दिला. बराच वेळ चर्चा सुरू होती. मात्र नवरीच्या हट्टापुढे कोणाचे काहीच चालले नाही.नवरीचा शेवटपर्यंत नकारच राहिला. अखेर हे लग्न मोडले. काही तासांसाठी पती बनलेल्या नवरदेवाला नवरीशिवायच आपली वरात घेऊन घरी परतावे लागले. संबंधित विवाहाची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे.
COMMENTS