सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर ) क्राईमनामा Live : समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ ज्युनियर कॉलेज बेल्हे(बांगरवाडी)या व...
सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर )
क्राईमनामा Live : समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ ज्युनियर कॉलेज बेल्हे(बांगरवाडी)या विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला असल्याची माहिती प्राचार्या वैशाली आहेर यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीचा निकाल नुकताच जाहीर झाला असून समर्थ ज्युनिअर कॉलेज मधील विज्ञान शाखेतून पायल गुंजाळ या विद्यार्थिनीने ८७.१७% गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला.तसेच सिद्धेश लामखडे ८६.१७ % द्वितीय क्रमांक व आरती वाघमारे आणि साहिल महाले यांनी ८३.१७% गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला.
शाखेनुसार विचार करता विज्ञान शाखेचा निकाल १०० टक्के, वाणिज्य(इंग्रजी माध्यम) शाखेतील रितेश गुंजाळ ८५.१७ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला.तन्वी गाडगे ८५% गुण मिळवून द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण तर पायल येवले ८४ % गुण मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली.अनुजा बारेकर ७४.८३ टक्के गुण मिळवून वाणिज्य(मराठी माध्यम) शाखेत प्रथम क्रमांक,पूनम डुकरे व सोनाली आहेर ७२.५० % गुण मिळवून द्वितीय क्रमांक तर अविनाश बेलकर व दिनेश डोंगरे ७२.३३% गुण मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले.
वाणिज्य(इंग्रजी माध्यम) शाखेचा १०० टक्के आणि वाणिज्य(मराठी माध्यम)शाखेचा निकाल १०० टक्के लागला आहे.
हया परीक्षेस समर्थ ज्युनिअर कॉलेज मधील विज्ञान व वाणिज्य शाखेतील एकूण १८० विद्यार्थी परिक्षेला बसले होते व १८० विद्यार्थी पास झाले असून कॉलेजचा निकाल १००% लागला आहे.
समर्थ कॉलेज मध्ये प्रथम श्रेणी मध्ये ११२ विद्यार्थी,६३ विद्यार्थी विशेष प्राविण्य तर ५ विद्यार्थी द्वितीय श्रेणी मिळवून उत्तीर्ण झाले.
या वर्षी १२ वीच्या परीक्षेला राज्यभरात एकूण १४ लाख ३९ हजार ७३१विद्यार्थी परीक्षेला बसले होते.यांमध्ये उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या १३ लाख ५६ हजार ६०४ आहे.राज्याचा इ १२ वी चा निकाल ९४.२२ इतका लागला आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊलीशेठ शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके यांनी हार्दिक अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
COMMENTS