पुणे: शिरूर तालुक्यातील रावडेवाडी येथे काही दिवसांपुर्वी विकास सोसायटीची निवडणुक झाली होती. जय-पराजयामुळे विरोधात प्रचार केल्याच्या कार...
पुणे: शिरूर तालुक्यातील रावडेवाडी येथे काही दिवसांपुर्वी विकास सोसायटीची निवडणुक झाली होती.
जय-पराजयामुळे विरोधात प्रचार केल्याच्या कारणामुळे दोन गटात तुंबळ हाणामारी झाली
असून, दोन्ही गटाकडून
परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत.
याबाबत फिर्यादी
भाऊसाहेब भिकाजी (पानगे वय 36 वर्ष धंदा- शेती रा. निमगाव दुडे,
ता. शिरूर, जि. पुणे) यांनी १) सागर वसंत रावडे,
२) अरुण वसंत रावडे, ३) दत्तात्र्य पांडुरंग रावडे,
४) संतोष रमेश रावडे, ५) रमेश दत्तोबा बडे (सर्व रा. रावडेवाडी ता. शिरूर, जि. पुणे)
यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. तसेच फिर्यादी सागर वसंतराव रावडे (वय ३०
वर्ष, व्यवसाय नोकरी, रा. रावडेवाडी ता.
शिरूर) यांनी १) भाऊसाहेब पोपट किटे (राहणार रावडेवाडी), २) भाऊसाहेब भिकाजी
पानगे (राहणार दुडेवाडी), ३) दत्तात्रय रामदास टिकेकर (राहणार रावडेवाडी), ४) गोरख रामदास टिकेकर
(राहणार निमगाव दुडे), ५) सुनिल पांडुरंग घोडे (राहणार निमगाव दुडे), ६) अरुण पोपट पानगे
(राहणार दुडेवाडी) यांच्याविरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याबाबत गुन्हे दाखल
केले आहेत.
याबाबत सविस्तर माहीती अशी की, रविवारी (ता. २६) दुपारी 12:30 वा चे सुमारास वरील आरोपींनी सोसायटीच्या निवडणूकीमध्ये त्यांचे विरोधात प्रचार केल्याच्या कारणावरून चिडून जाऊन जीवे
मारण्याच्या उद्देशाने लोखडी रॉड लाकडी काठी व लाथाबुक्क्यांनी डोक्यात हातापायावर पाठीवर मारहाण
करून गंभीर दुखापत
केली आहे. या भागात राजकिय वातावरण चांगलच तापले असून, एकमेकांचे
जीवघेण्यापर्यंत मजल गेली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
COMMENTS