जयपूर (राजस्थान): एका युवकाचा विवाह मोठ्या उत्साहात पार पडला होता. विवाहानंतर नवरी सासरी पण आली होती. पण, विवाहानंतर १२ दिवसांनी नवरी घराम...
जयपूर (राजस्थान): एका युवकाचा विवाह मोठ्या उत्साहात पार पडला होता. विवाहानंतर नवरी सासरी पण आली होती. पण, विवाहानंतर १२ दिवसांनी नवरी घरामधील रोख रक्कमेसह दागिने घेऊन पळून गेल्यामुळे नवरदेवासह कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.
नवरदेव तर मोठमोठ्याने रडायलाच लागला. संबंधित घटना सिकर जिल्ह्यातील दादिया पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडले आहे.
पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतल्यानंतर पळून गेलेल्या महिलेला श्रीगंगानगर जिल्ह्यातून अटक केली आहे. ही लुटारू नववधू लग्नाच्या १२ दिवसानंतर १६ तोळे दागिने आणि ७५ हजार रुपये रोख रक्कम घेऊन पसार झाली होती. दरम्यान, ही महिला तीन मुलांची आई असल्याची माहिती तपासात उघड झाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'पिपराली परिसरातील सुरेश कुमार शर्मा याने २९ मे रोजी तक्रार दिली होती. त्याआधारे गुन्हा नोंद करून पोलिसांनी लुटारू नववधू गगनदीप हिला अटक केली. ती श्रीगंगानगर येथील राहणारी आहे. सुरेशने १५ मे रोजी एका दलालामार्फत गगनदीप हिच्याशी विवाह केला होता. त्याबदल्यात दलालांनी त्याच्याकडून सुरुवातीला ५३ हजार रुपये घेतले होते. त्यानंतर २३ हजार रुपये घेतले. विवाहानंतर सुरेश गगनदीपसोबत राहू लागला. मात्र लग्नाच्या १२ दिवसांनंतर गगनदीप घरातून १६ तोळे सोने आणि ७५ हजार रुपये घेऊन पसार झाली होती. तपासादरम्यान गगनदीपच्या मुसक्या आवळल्या असून, पुढील तपास सुरू आहे.'
COMMENTS