सांगली : म्हैसाळ (ता. मिरज) गावामध्ये २० जून रोजी नऊ जणांचे मृतदेह आढळून आल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. कुटुंबाची हत्या की आत्महत्या ? अस...
सांगली : म्हैसाळ (ता. मिरज) गावामध्ये २० जून रोजी नऊ जणांचे मृतदेह आढळून आल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. कुटुंबाची हत्या की आत्महत्या? असा अनेकांना प्रश्न पडला होता.
मोहम्मद अली
बागवान आणि त्याचा चालक धीरज सुरवसे अशी आरोपींची नावे आहेत. सांगली पोलिसांनी
अवघ्या सात दिवसात दोन मुख्य आरोपींना अटक केली आहे. आरोपींना चहातून विष देऊ
हत्या केली पण, ही हत्या वाटू नये, यासाठी सुसाईड नोटही लिहिली होती. पोलिसांना चकवा देण्यासाठी लिहिलेली
सुसाईड नोटच आरोपी मांत्रिक अब्बास आणि त्याचा ड्रायव्हर धीरजला गजाआड घेऊन गेली.
चहातून मांत्रिक अब्बास आणि त्याच्या ड्रायव्हरने वनमोरे कुटुंबाला विष दिले.
संपूर्ण कुटुंब बेशुद्ध पडल्यानंतर एक बोगस सुसाईड नोट या दोघांनी तयार केली. या
नोटमधील मजकुराने पोलिसांना संशय आला. त्यातून पुढे तपास केला होता. पोलिसांनी
सीसीटीव्ही तपासल्यानंतर एक संशयास्पद गाडी पोलिसांच्या नजरेस पडली. अखेर दोघांना
पोलिसांना शोधून काढले.
आरोपींनी सुसाईड
नोटच्या सुरुवातीलाच सावकारांची नाव सुसाईड नोटमध्ये लिहून दिशाभूल करण्याचा प्रयत्न
मुख्य आरोपी आणि मांत्रिक असलेल्या मोहम्मद अली बागवान आणि त्याचा ड्रायव्हर धीरज
सुरवसेने केला होता. मांत्रिक अब्बास गुप्तधन शोधून देईल यायची आस वनमोरे
कुटुंबाला होता. त्यासाठी अब्बासने एक कोटी रुपये इतकी रक्कम वनमोरेंकडून घेतली
होती. पण, आर्थिक अडचण भासू
लागल्यामुळे कुटुंबाने अब्बासकडे पैशांची मागणी केली. एक दिवस अब्बास आपल्या
ड्रायव्हरसर गुप्तधन शोधून देतो म्हणून त्याने कुटुंबातील सगळ्यांना गच्चीत
पाठवले. गच्चीतून जेव्हा वनमोरे कुटुंबीय खाली घरात आले, तेव्हा अब्बासने
वनमोरे कुटुंबाला चहा पाजला. या चहात त्याने विष कालवले होते. एक एक करुन
प्रत्येकजण चहा पिऊन बेशुद्ध पडला. त्यानंतर आपल्यावर हत्येचा आळ येऊ नये, यासाठी अब्बासने
सुसाईड नोट लिहून पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न केला. पण, पोलिसांच्या नजरेतून
तो सुटला नाही. पोलिस याबाबत पुढील तपास करत आहेत.
COMMENTS