इंदूर (मध्य प्रदेश): पती हा संध्याकाळी महिलांसारखा सजतो आणि शृंगार करतो आणि रात्र झाली की नवरा दुसऱया खोलीत झोपायला जातो, अशी तक्रार एका म...
इंदूर (मध्य प्रदेश): पती हा संध्याकाळी महिलांसारखा सजतो आणि शृंगार करतो आणि रात्र झाली की नवरा दुसऱया खोलीत झोपायला जातो, अशी तक्रार एका महिलेने केल्यानंतर अनेकजण आश्चर्यचकीत झाले आहे.
याबाबत महिलेने न्यायालयात धाव घेतली आहे.
पत्नीने केलेल्या आरोपांनुसार, नवरा अभियंता असून, तो संध्याकाळनंतर महिलांसारखा सजतो आणि शृंगार करतो. शिवाय, आपल्यासोबत शारिरीकसंबंध ठेवत नाही. रात्री तो दुसऱ्या खोलीत जाऊन झोपतो. नवऱयाच्या विचित्र वागण्याला कंटाळले आहे.' दरम्यान, जिल्हा न्यायालयात याप्रकरणी सुनावणीही झाली. त्यानंतर न्यायालयाने पीडित पत्नीला दरमहा 30 हजार रुपये पोटगी द्यावी असा आदेश दिला आहे.
29 एप्रिल 2018 ला दोघाचे लग्न झाले होते. लग्नानंतर पुढील काही दिवस चांगले गेले. पण, त्यानंतर सासरचे छोट्या-मोठ्या कारणावरुन पत्नीला टोमणे मारायला लागले. तिला एका खोलीत बंद करुन ठेवले जात होते. पती एकदा पत्नीला पुण्याला घेऊन आला होता आणि तिथे त्याने पीडितेचा छळ केला, असा युक्तिवाद पीडितेच्या वकिलांनी केला आहे. पीडितेचा पती तिच्याशी संबंध ठेवत नव्हता आणि सगळा खर्च तिच्याकडून घेत होता, असा आरोप करण्यात आला आहे.
टिकली, लिपस्टिक आणि कानातले घालून पीडित पत्नीचा पती शृंगार करायचा आणि पीडितेचा मानसिक छळ करत होता. 12 जून 2022 रोजी पीडितेला माहेरी आणून सोडण्यात आले आहे. पीडितेने आपल्याकडे पतीनं केलेल्या विक्षिप्त गोष्टींचे फोटो आणि व्हिडीओही असल्याचा दावा केलाय. यानंतर पोलिसात तक्रार देण्यात आली होती. दरम्यान, पती-पत्नी प्रकरण चर्चेत आले असून, अनेकजण चर्चा करत आहेत.
COMMENTS