बातमी संकलन- आत्माराम उंडे. क्राईमनामा Live : आज दिनांक १४ जून २०२२ रोजी राळेगण ते नारायणगाव या मार्गाच्या बस सेवेचा उद्घाटन सेवेचा शुभारं...
बातमी संकलन- आत्माराम उंडे.
क्राईमनामा Live : आज दिनांक १४ जून २०२२ रोजी राळेगण ते नारायणगाव या मार्गाच्या बस सेवेचा उद्घाटन सेवेचा शुभारंभ पार पडला.
राळेगण गावामध्ये या बस सेवेच्या उद्घाटन प्रसंगी राळेगण गावामध्ये आनंदाचे वातावरण झाले होते.
या बस सेवेच्या प्रारंभामुळे या मार्गावरील बहुतांश गावांतील नागरीकांनी या बस सेवेच्या उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थिती लावलेली होती.
या बस सेवेमुळे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरीक व सर्वसामान्यांना फायदा होणार आहे.
कार्यक्रम प्रसंगी जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके, जि. प. सदस्य देवराम लांडे, बाजीराव ढोले, नारायणगाव डेपोचे सूर्यवंशी साहेब, चालक व वाहक, भारतीय जनता पार्टीचे जुन्नर तालुका उपाध्यक्ष आत्माराम उंडे एसटी बस सुरू करण्याकरीता ज्यांनी योगदान दिले ते छत्रपती हायस्कुल येणेरे हायस्कुलचे सर्व शिक्षक व राळेगण गावचे नागरीक तसेच पंचक्रोशीतील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
COMMENTS