जालना: जालना पोलिसांनी केलेल्या कारवाईत तलवारींचा मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे. या कारवाईत विविध प्रकारच्या 9 धारदार तलवारी आहेत. याबाबत पो...
जालना: जालना पोलिसांनी केलेल्या कारवाईत तलवारींचा मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे. या कारवाईत विविध प्रकारच्या 9 धारदार तलवारी आहेत. याबाबत पोलिस पुढील तपास करत आहेत.
राज्यात एकीकडे सत्तासंघर्षाचा पेच निर्माण झाला असल्यामुळे कोणतेही विघ्न घडू नये म्हणून पोलिस यंत्रणा हायअलर्ट झाली आहे. राजकीय तणावपूर्ण वातावरणात जालना शहरात मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील वाल्मिकनगर परिसरात छापा मारून पोलिसांनी तलवारीचा मोठा साठा जप्त केला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही धडक कारवाई केली होती.
शहरातील अवैध शस्त्र शोधण्यासाठी पोलिस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेने तीन वेगवेगळे पथक तयार करून त्याद्वारे शोध मोहीम सुरू केली आहे. सदर तलवारी मंगलबजार येथील आफ्रोज हाफिज पठाण यांच्या मार्फत खरेदी केल्याचे चौकशीत समोर आले. याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या गँगमध्ये आणखी कुणाचा समावेश आहे. त्यांनी यापूर्वी अजून किती तलवारी खरेदी विक्री केल्या आणि त्याचा कुठे घातपातसाठी वापर केला जाणार होता का यादृष्टीने पोलिस पुढील तपास करत आहे.
COMMENTS