पुणे: शिक्रापूर (ता. शिरुर) येथील एका विवाहितेचे लग्न झालेले असताना तिला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. शिक्...
पुणे: शिक्रापूर (ता. शिरुर) येथील एका विवाहितेचे लग्न झालेले असताना तिला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे महेश बबन ब्राम्हणे या युवकावर गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्याला न्यायालयीन कोठडी ठोठावली आहे.
शिक्रापूर (ता.
शिरुर) येथील विवाहिता महिलेशी महेश यांची ओळख झाल्यानंतर त्याने वेळोवेळी
विवाहीतेशी जवळीक निर्माण केली. विवाहितेला लग्नाचे आमिष दाखवत वारंवार बाहेर घेऊन
जात शारीरिक संबंध प्रस्तापित केले. मात्र,
त्यांनतर विवाहीतेशी विवाह करण्यास नकार दिल्याने सदर महिलेने शिक्रापूर
पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे.
शिक्रापूर
पोलिसांनी महेश बबन ब्राम्हणे (वय ३२ रा. शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे) याच्या
विरुद्ध गुन्हे दाखल करत त्याला अटक केली आहे. न्यायालयाने प्रथम पोलिस कोठडी
सुनावत दुसऱ्यांदा न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. सदर गुन्ह्याचा
पुढील तपास पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस
निरीक्षक नितीन अतकरे व पोलिस नाईक रोहिदास पारखे हे करत आहेत.
COMMENTS