भोपाळ (मध्य प्रदेश): इंदूर येथे एका पत्नीने तिच्या रंगेल पतीला चांगलीच अद्दल घडवली आहे. तिने सर्वप्रथम फेसबूकवर बनावट नावाने एक आयडी तयार ...
भोपाळ (मध्य प्रदेश): इंदूर येथे एका पत्नीने तिच्या रंगेल पतीला चांगलीच अद्दल घडवली आहे. तिने सर्वप्रथम फेसबूकवर बनावट नावाने एक आयडी तयार केला. त्यानंतर पतीला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली.
तसेच ही रिक्वेस्ट एक्सेप्ट झाल्यानंतर दोघेही एकमेकांसोबत बोलू लागले. पोलिस कर्मचाऱ्याने पत्नीला दुसरी युवती समजून तिच्याकडे किस आणि सेक्सची मागणी केली. मात्र जेव्हा सत्य समजले तेव्हा या रंगेल पोलिस अधिकाऱ्याला धक्का बसला.
मनिषा चावंड (रा. सुखलिया, इंदूर) यांचा सत्यम बहल याच्याशी २०१९ मध्ये विवाह झाला आहे. पोलिस कर्मचारी असलेला सत्यम बहल पत्नीचा शारीरिक आणि मानसिक छळ करू लागला. पत्नीला किरकोळ कारणांवरून बाथरूमध्ये कोंडून ठेवू लागला. तसेच मारहाणही करू लागला. याबाबतची माहिती तिने आई-वडिलांना दिली. त्यानंतर महिला पोलिस ठाण्यात आरोपी पतीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. सध्या न्यायालयात प्रकरण आहे.
मनिषा माहेरी असताना पतीवर संशय आला. तेव्हा तिने पतीला बनावट फेसबूक आयडीवरून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. सोशल मीडियावर स्वत:ला सिंगल दाखवणारा सत्यम तिच्यासोबत तासनतास बोलू लागला. शिवाय, त्याने किस आणि सेक्सचीही मागणी केली. दरम्यान, पत्नीने या व्हॉट्सअॅप चॅटचे स्क्रिनशॉट न्यायालयात पुरावा म्हणून दाखल केला आहे.
पीडितेच्या आरोपांची दखल घेताना इंदूरमधील जिल्हा न्यायालयाने आरोपीविरोधात कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण देणाऱ्या कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने महिलेला खर्च म्हणून २ लाख रुपये आणि पोटगी म्हणून दरमहा ७ हजार रुपये देण्याचे आदेश पतीला दिले आहेत.
COMMENTS