प्रतिनिधी : गणेश गाडगे. क्राईमनामा Live : निमगांव सावा येथे आज हिवताप ( डेंग्यु ) जन - जागृती मोहिमेअंतर्गत पंडित नेहरू विद्यालय येथे विदय...
प्रतिनिधी : गणेश गाडगे.
क्राईमनामा Live : निमगांव सावा येथे आज हिवताप ( डेंग्यु ) जन - जागृती मोहिमेअंतर्गत पंडित नेहरू विद्यालय येथे विदयार्थ्यांना मार्गदर्शन निमगाव सावा येथे सध्या डेंगुचे रूग्न वाढत असल्यामुळे निमगाव सावा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्राचा स्टाफ घरोघरी जाऊन ग्रामस्थांना आरोग्याच्या दृष्टीने मार्गदर्शन करत आहे.
पंडित नेहरू विदयालय येथे तालुका आरोग्य अधिकारी पर्यवेक्षक श्री.दिलीप कचरे साहेब यांनी हिवताप ( डेंग्यु ) या आजाराविषयी मार्गदर्शन केले. याप्रसंगी आरोग्य केंद्राचा संपूर्ण स्टाफ उपस्थित होता. त्यामध्ये आरोग्य अधिकारी संभाजी घोडे निमगांव सावा, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, गट परिवर्तक व आशा सेविका व शाळेच्या मुख्याध्यापिका चव्हाण मॅडम व सर्व शिक्षक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
COMMENTS