चंदीगड (पंजाब): प्रेमविवाह केलेल्या बहिणीची तिच्या भावांनी भर बजारात धारधार शस्त्रांनी हत्या केल्याची धक्कादायक घटना तरनतारन जिल्ह्यात घडली ...
चंदीगड (पंजाब): प्रेमविवाह केलेल्या बहिणीची तिच्या भावांनी भर बजारात धारधार शस्त्रांनी हत्या केल्याची धक्कादायक घटना तरनतारन जिल्ह्यात घडली आहे. अचानक घडलेल्या या घटनेनंतर बाजारात एकच खळबळ उडाली.
पोलिसांनी तक्रार दाखल केली असून, पुढील तपास करत आहेत.
युवतीने तीन महिन्यांपूर्वी प्रेमविवाह केला होता. युवतीच्या कुटुंबीयांना हे लग्न मान्य नव्हते. याच नाराजीतून तिच्या सख्या आणि चुलत भावानी मिळून युवतीची भर बाजारात हत्या केली. स्नेहा असे या मृत युवतीचे नाव आहे. स्नेहा हिचे राजन जोशन या युवकासोबत प्रेमसंबंध होते. पण, दोघांच्या विवाहाला स्नेहाच्या घरच्यांनी नकार दिला होता. पण, स्नेहाने घरच्यांच्या विरोधात जाऊन तीन महिन्यांपूर्वी स्थानिक कोर्टात लग्न केले होते. स्नेहा शुक्रवारी (ता. १८) रात्री खरेदीसाठी बाजारात गेली होती. त्यावेळी तिथे दबा धरून बसलेल्या तिच्या भावांनी स्नेहावर भर बाजारातच धारधार शस्त्रांनी सपासप वार केले. या हल्ल्यानंतर स्नेहा पाच मिनिट तडफडत होती पण कुणीही तिला मदत केली नाही. त्यानंतर हॉस्पिटलमध्ये जाण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला.
स्नेहाचा सख्या भाऊ रोहित आणि चुलत भाऊ अमर यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सध्या हे आरोपी फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
COMMENTS