नवी दिल्लीः राजधानीमधील बदरपूर भागात एका आठ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. पण, बलात्कार करणारा आरोपी HIV ...
नवी दिल्लीः राजधानीमधील बदरपूर भागात एका आठ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. पण, बलात्कार करणारा आरोपी HIV पॉझिटिव्ह असल्याची माहिती समोर आली आहे.
आरोपीची माहिती मिळताच संबंधित पीडित मुलीचीही तपासणी करण्यात आली आहे. सुदैवाने पीडित चिमुकलीची टेस्ट निगेटिव्ह आली आहे. मात्र, पुन्हा एकदा मुलीची टेस्ट करण्यात येणार आहे. आरोपीने अनेक महिलांसोबत शारीरिक संबंध ठेवला होता. त्याने 15 जूनला संबंधित चिमुकलीवर बलात्कार केला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांनी आरोपी राहुलला पलवल येथून त्याच्या आत्याच्या घरून अटक केली. त्याच्या विरोधात POSCO अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे. आरोपीने बलात्कारादरम्यान मुलीच्या शरीरावर अनेक ठिकाणी चावे घेतले होते. तिच्या शरीरावर 20 हून अधिक जखमा आढळून आल्या होत्या. अत्याचार झालेल्या चिमुकलीला एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. यानंतर तिच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर, तिला घरी पाठवण्यात आले असून, या प्रकरणानंतर पीडितेच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.
COMMENTS