सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर ) माणिकडोह धरणाच्या परिक्षेत्रात असणारी जि. प. प्राथ. शाळा ठाकरवाडी(तेजूर) येथे शाळा पूर्वतयारी वर्ग मेळाव...
सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर )
माणिकडोह धरणाच्या परिक्षेत्रात असणारी जि. प. प्राथ. शाळा ठाकरवाडी(तेजूर) येथे शाळा पूर्वतयारी वर्ग मेळावा उत्साहात संपन्न करण्यात आला अशी माहिती मुख्याध्यापक आ.का. मांडवे यांनी दिली.
सकाळी प्रभात फेरी काढून घोषणा देऊन वातावरण निर्मिती करण्यात आली. शाळा परिसर फुगे लावून सजविण्यात आला होता. आकर्षक फलक लेखन करण्यात आले होते. इयत्ता पहिली मध्ये दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांची वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. सर्व मुलांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. इयत्ता १ली ते ७ वीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके वाटण्यात आली. इयत्ता १लीमधील दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांचा शाळा पूर्वतयारी मेळावा क्र.२ घेण्यात आला यामध्ये प्रामुख्याने विकास पत्राच्या अनुषंगाने नोंदणी, शारीरिक विकास, बौद्धिक विकास, सामाजिक व भावनात्मक विकास, भाषा विकास व गणनपूर्व तयारी बाबत विविध क्षमतांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचीं तयारी पहाण्यात आली.
मेळाव्याचे प्रास्ताविक सचिन नांगरे सर यांनी केले.मेळाव्यास मार्गदर्शन मुख्याध्यापक .आ.का.मांडवे यांनी तर कार्यक्रमाचे नियोजन लक्ष्मण कुडेकर सर व मोहन उंडे सर यांनी केले. सूत्रसंचलन तानाजी तळपे सर यांनी केले.
याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जालिंदर दुधवडे, दशरथ भालेकर, संतोष दुधवडे अंगणवाडी सेविका सौ.कुंता तुरे, मदतनीस सौ.विमल केदार व दाखलपात्र मुलांचे पालक व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.
COMMENTS