भोपाळ (मध्य प्रदेश): सोशल मीडियासाठी प्रसिद्ध असलेल्या फेसबुकवरून एका युवतीसोबत ओळख झाली होती. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाल्यानंतर दोघांनी...
भोपाळ (मध्य
प्रदेश): सोशल मीडियासाठी प्रसिद्ध
असलेल्या फेसबुकवरून एका युवतीसोबत ओळख झाली होती. ओळखीचे रुपांतर प्रेमात
झाल्यानंतर दोघांनी लग्न करायचे ठरवले. शिवाय, दोघांमध्ये शारीरीक संबंध निर्माण
झाले.
ग्वाल्हेरमध्ये
राहणाऱ्या युवतीची (वय २६) फेसबुकच्या माध्यमातून मनीष कुशवाह याच्यासोबत ओळख झाली
होती. ओळखीचे रुपांतर हळूहळू मैत्रीत झाले. एके दिवशी युवकाने तिला हॉटेलमध्ये
बोलावले आणि लग्नाचे आमिष देऊन शरीर संबंध ठेवले. यानंतरही दोघांमध्ये वारंवार
शरीर संबंध आले. युवतीने दबाव आणल्यानंतर तिच्यासोबत लग्न केले. लग्नानंतर तो युवतीच्या
घरी राहायला गेला. नवरा आपल्याला त्याच्या घरी नेण्यास टाळाटाळ करत असल्याचे
तिच्या लक्षात आले. एकेदिवशी ती थेट नवऱयाच्या घरी पोहोचली. यानंतर तिला धक्काच
बसला.
युवकाच्या घरी
पोहोचताच तो आधीच विवाहित आहे आणि त्याला दोन मुले असल्याचे समजले. यानंतर युवतीने
थेट पोलिस ठाणे गाठले आणि तक्रार दाखल केली. याबाबत पोलिस पुढील तपास करत आहेत.
COMMENTS