पुणे: कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील पुणे-नगर महामार्गावर भरधाव ट्रक विजेच्या खांबाला धडकून उलटला. विजेच्या खांबा बरोबरच ट्रकचेही मोठे नुकसा...
पुणे: कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील पुणे-नगर महामार्गावर भरधाव ट्रक विजेच्या खांबाला धडकून उलटला. विजेच्या खांबा बरोबरच ट्रकचेही मोठे नुकसान झाले आहे. शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे कानसिंग खुमसिंग रावत या ट्रक चालकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
कोरेगाव भीमा येथील पुणे-नगर महामार्गावर रविवारी (ता. १२) रात्री बारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. जि जे १२ बी वाय ८९०९ या ट्रकवरील चालक हा पुणे बाजूने अहमदनगर बाजूला भरधाव वेगाने आला. यावेळी ट्रक चालकाला एका वाहनाने हूल दिल्याने ट्रक चालकाचा ट्रक वरील ताबा सुटल्याने ट्रक रस्त्याचे कडेला असलेल्या विजेच्या खांबावर आदळला. रस्त्याचे कडेला उलटला यावेळी विजेचा खांब पूर्णपणे वाकून विजेच्या तारा देखील तुटून रस्त्यावर पडल्या आणि विजेच्या खांबासह तारांचे नुकसान झाले. यामध्ये चालक देखील काही प्रमाणात जखमी झाला आहे.
याबाबत विद्युत वितरण विभागाचे वरिष्ठ तंत्रज्ञ कैलास दयाराम गोडाम (वय ३९, रा. कोरेगाव भीमा ता. शिरुर जि. पुणे मूळ रा. उर्मी ता. वरोरा जि. चंद्रपूर) यांनी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. शिक्रापूर पोलिसांनी ट्रक चालक कानसिंग खुमसिंग रावत (वय ५६ वर्षे रा. बग्गर ता. भीम जि. राजसंमद राजस्थान) याचे विरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार राजेश माने हे करत आहेत.
COMMENTS