उस्मानाबाद : उस्मानाबाद तालुक्यातील बेंबळी पोलिस ठाणे हद्दीतील चिखली गावात चोरट्यांनी घराची पाठीमागील खिडकी उघडून आत प्रवेश करून रोख रक्...
उस्मानाबाद : उस्मानाबाद तालुक्यातील बेंबळी
पोलिस ठाणे हद्दीतील चिखली गावात चोरट्यांनी घराची पाठीमागील खिडकी उघडून आत
प्रवेश करून रोख रक्कम आणि दागिने असा एकूण अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून
नेल्याची घटना १ जून रोजी घडली होती.
पोलिसांकडून
मिळालेल्या माहितीनुसार, १ जुन रोजी रात्री ९ ते २ जून रोजी पहाटे सहाच्या दरम्यान बेंबळी पोलिस
स्टेशन हद्दीतील चिखली येथील संभाजी शिवाजी सुरवसे यांच्या घराच्या पाठीमागील
खिडकी उघडून आता प्रवेश करून चोरट्यांनी कापडी पिशवीत ठेवेलेले १ लाख ८० हजार रु.
रोख आणि कपाटातील ५ ग्रॅम वजनाच्या तीन अंगठ्या, सोन्याचे कानातले फुलं, झुबे, ठुशी असा एकूण २ लाख
५५ हजारांचा ऐवज लंपास केला होता. या प्रकरणात पोलिसांनी उस्मानाबाद तालुक्यातील
सुंभा येथील अक्षय बाळू शिंदे (वय २५) यास अटक केली. त्या नंतर त्याच्याकडे अधिक
चौकशी केली असता या चोरीत आणखी चौघे सहभागी असल्याचे निष्पन्न झाले. त्या नंतर
त्याच्या जवळील चोरीची होंडा कंपनीची युनिकॉर्न मोटारसायकल ताब्यात घेतली तेव्हा
ती दुचाकी सोलापूर जिल्ह्यातील वैराग पोलिस ठाण्याअंतर्गत चोरीच्या घटनेतील
असल्याचे निष्पन्न झाले. त्या मुळे एका आरोपीच्या अटकेतून दोन गुन्हे उघडकीस आले.
अक्षय बाळु
शिंदे (रा. सुंभा) यासह चार जणांच्या विरोधात बेंबळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
करण्यात आला आहे. या पाच जणांनी चिखली येथे घरफोडी करून सोन्याचे दागिने रोख रक्कम
लंपास केली होती. तसेच वैराग पोलिस ठाण्याच्या हद्दीतून होंडा कंपनीची युनिकॉर्न
मोटारसायकल लंपास केली होती, या प्रकरणी वैराग पोलिस ठाण्यात देखील गुन्हा दाखल आहे.
संबंधित कारवाई
उपविभागीय पोलिस अधिकारी कल्याण घेटे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि मच्छिंद्रनाथ
शेंडगे, पोउपनि पांडुरंग माने, हेकॉ. नवनाथ बांगर, पोना रविकांत जगताप, विनायक तांबे, सुनील इगवे, सचिन कोळी यांच्या
पथकाने केली.
COMMENTS