पुणेः आझम कॅम्पस मैदान या ठिकाणी पार पडलेल्या पुणे जिल्हा क्रिकेट असोशियन आयोजित सदू शिंदे लीग क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पुणे पोल...
पुणेः आझम कॅम्पस मैदान या ठिकाणी पार पडलेल्या पुणे जिल्हा क्रिकेट असोशियन आयोजित सदू शिंदे लीग क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पुणे पोलिस क्रिकेट संघाने उपविजेतेपद पटकावले आहे.
एकूण 36 संघांनी या लीगमध्ये भाग घेतला होता. पुणे शहर पोलिस दलाच्या संघाने त्यांच्या गटातील सर्व पाच सामने मोठ्या फरकाने जिंकून सेमी फायनल मध्ये प्रवेश केला होता. तसेच सेमी फायनल मध्ये संडे स्पोर्ट्स क्लबचा दणदणीत पराभव करून अंतिम सामन्यात प्रवेश केला होता. अंतिम सामन्यांमध्ये पुणे शहर पोलिस क्रिकेट टीम पराभूत झाली असली तरी उपविजेतेपद मिळविले आहे.
अंतिम सामन्यांमध्ये खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे म्हणून पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता हे स्वतः उपस्थित राहून त्यांनी प्रत्यक्ष खेळात सहभाग घेऊन खेळाडूंचा उत्साह वाढवला. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी संपूर्ण टीम व सपोर्ट स्टाफचे अभिनंदन केले आहे.
COMMENTS