प्रतिनिधी : शरद शिंदे क्राईमनामा Live : आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुराळे येथे ॲफिनिटी एक्स, उर्मी फाऊंडेशन. व दुर्ग संवर्धन प्रतिष्ठान प...
प्रतिनिधी : शरद शिंदे
क्राईमनामा Live : आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुराळे येथे ॲफिनिटी एक्स, उर्मी फाऊंडेशन. व दुर्ग संवर्धन प्रतिष्ठान पुणे यांचे वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. तसेच शाळेला एक संगणक प्रदान करण्यात आला. या प्रसंगी महाराष्ट्र टाइम्सचे पत्रकार धर्मेंद्र कोरे, ॲफिनिटी एक्स च्या अंकिता कुलकर्णी, अक्षदा खिल्लारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष गुलाबराव मातेले, रामदास चतुर, दशरथ मातेले, चंद्रकांत मातेले, वसंतराव मातेले,रखमाजी चतुर इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते.
सदर संस्थांच्या माध्यमातून दरवर्षी जुन्नर तालुक्यातील आदिवासी दुर्गम भागातील प्राथमिक शाळांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येते. या वर्षीही जुन्नर तालुक्यातील आदिवासी दुर्गम भागातील ५५ शाळांना वह्या, ड्रॉइंगबुक, कलरबाॅक्स, कंपास बॉक्स, पेन, पेन्सिल इ. साहित्याचे व २९ शाळांना संगणकाचे वाटप करण्यात आले. या कामी दुर्ग संवर्धन प्रतिष्ठान पुणे चे संतोष जाधव सर व महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे सल्लागार संजय डुंबरे यांची मोलाची मदत झाल्याची माहिती पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे सरचिटणीस खंडेराव देवराम ढोबळे यांनी दिली.
सुराळे शाळेतील कार्यक्रमाचे नियोजन पदवीधर शिक्षक पंढरीनाथ उतळे, देवराम भांगे, मंगल मरभळ यांनी केले. यावेळी संतोष पाडेकर, संतोष पानसरे, तानाजी तळपे, अंकुश साबळे, तुकाराम वडेकर इत्यादी शिक्षक वर्ग उपस्थित होते.
COMMENTS