पुणेः सराईत गुन्हेगारास शिताफिने अटक करुन त्याच्याकडून एक रिक्षा, तीन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून, एकूण ४ गुन्हे उघडकीस आणण्यात भा...
पुणेः सराईत गुन्हेगारास शिताफिने अटक करुन त्याच्याकडून एक रिक्षा, तीन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून, एकूण ४ गुन्हे उघडकीस आणण्यात भारती विदयापीठ पोलिसांना यश आले आहे.
याबाबत पोलिस पुढील तपास करत आहेत.
०१/०६/२०२२ रोजी तपास पथकातील पोलिस अंमलदार अभिजित जाधव व विक्रम सावंत यांना त्यांचे बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, वाहन चोरी करणारा रेकॉर्डवरील गुन्हेगार सचिन चिंतामणी हा जैन मंदीर कात्रज परिसरात एका पांढ-या-केसरी रंगाची केटीएम गाडीवरुन फिरत आहे. सदरची बातमी वरिष्ठ पोलिस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांना कळविली असता, त्यांनी लागलीच तपास पथकाचे अधिकारी पोउपनिरी धिरज गुप्ता व पोउपनिरीक्षक नितीन शिंदे तसेच त्यांचे तपास पथकाचे स्टाफला सापळा लाऊन कारवाई करणे बाबत आदेश दिले. तपास पथकाचे अधिकारी व कर्मचारी यांनी सच्चाईमाता मंदिर, आंबेगाव पुणे याठिकाणी सापळा लावला. एका पांढ-या केसरी रंगाचे केटीएम गाडीवरुन दिसून आला तेंव्हा त्यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली. सचिन सुरेश चिंतामणी (वय ३७ वर्षे, रा. चाळ नंबर १६, साई मंदीरजवळ, सच्चाई माता जैनमंदीर जवळ कात्रज पुणे) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडे असलेली के.टी.एम आर. सी २०० दुचाकी क्रमांक एम.एच. १२ क्यू/पी ६०६४ हीच्याबाबत विचारणा केली असता सदरची गाडी चोरी केल्याची कबुली दिली.
सदर गाडीचे अभिलेख तपासणी केली असता सदरची दुचाकीवर भारती विदयापीठ पोलिस स्टेशन गु.र.नं. ७१८/२०२१ भादवि कलम ३७९ अन्वये गुन्हा नोंद असल्याची माहीती प्राप्त झाली सदर गुन्हयामध्ये त्यास अटक करण्यात आली आहे. तसेच त्याचेकडे गुन्हयाचे अनुषंगाने सखोल तपास केला असता त्याचेकडून आणखी २ दुचाकी व १ रिक्षा जप्त करण्यात आली आहे. सदर गाडया बाबत पोलिस स्टेशनचे अभिलेखावरुन माहिती घेतली असता, रिक्षाचे बाबत चिंचवड पोलिस स्टेशन येथे गु.र.नं. १०८/२०२२ भादवि कलम ३७९, अॅक्टीवा मोपेड बाबत हडपसर पोलिस स्टेशन गु.र.नं. ४०९/२०२२ भादवि कलम ३७९ व युनिकॉन कंपनीची दुचाकी बाबत मार्केट यार्ड पोलिस स्टेशन गु.र.नं. ८३/२०२२ भा.द.वि. कलम ३७९ अन्वये गुन्हे नोंद असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. सदर आरोपीकडून ०४ गुन्हे उघड झाले असून ३ दुचाकी व १ रिक्षा असे एकुण १,८५,०००/- रुपयाचे गाडया जप्त करण्यात आल्या आहेत.
सदरची कामगिरी ही सागर पाटील, पोलिस उप आयुक्त परिमंडळ ०२, पुणे शहर, सुषमा चव्हाण, सहाय्यक पोलिस आयुक्त, जगन्नाथ कळसकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, संगिता यादव, पोलिस निरीक्षक (गुन्हे), पोलिस निरीक्षक विजय पुराणिक यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकार पोलिस उप निरीक्षक नितीन शिंदे, धिरज गुप्ता, तपास पथकांचे अंमलदार रविंद्र चिप्पा, गणेश भोसले, अभिजित जाधव, गणेश शेंडे, राहूल तांबे, विक्रम सांवत, सचिन गाडे, आशिष गायकवाड, अवधुत जमदाडे, आकाश फासगे, तुळशीराम टेंभुर्णे यांचे पथकाने केली आहे.
COMMENTS