पुणे: शिक्रापूर (ता. शिरुर) येथील दोन युवक फोनवर बोलत असताना एका युवकाला शिवी दिल्याने दोघांमध्ये वादावादी होत हाणामारी झाली. शिक्रापूर पो...
पुणे: शिक्रापूर (ता. शिरुर) येथील दोन युवक फोनवर बोलत असताना एका युवकाला शिवी दिल्याने दोघांमध्ये वादावादी होत हाणामारी झाली. शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे विकी राजेश खराडे, दिलावर सुभान शेख, ओंकार कुंभार, सिद्धेश शेलार यांच्या विरुद्ध परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
शिक्रापूर (ता. शिरुर) येथील महाबळेश्वर नगर व इको ग्राम सोसायटी मधील विकी खराडे व ओंकार कुंभार हे फोनवर बोलत असताना त्यांनी दिलावर शेख यांना शिवी दिली. त्यामुळे दिलावर हे विकी याला जाब विचारण्यासाठी गेले असता त्यांच्यात वाद झाला. दरम्यान, दोघांनी एकमेकांना मारहाण केली. यावेळी विकी याची आई मध्ये आली असता तिला देखील मारहाण करण्यात आली. याबाबत दिलावर सुभान शेख (रा. महाबळेश्वर नगर शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे) व सुनिता राजेश खराडे (रा. इको ग्राम सोसायटी शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे.
शिक्रापूर पोलिसांनी विकी राजेश खराडे (रा. इको ग्राम सोसायटी शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे) व दिलावर सुभान शेख, ओंकार कुंभार, सिद्धेश शेलार (रा. महाबळेश्वर नगर शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे) यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. पुढील तपास पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार मंगेश लांडगे व पोलिस नाईक संतोष मारकड हे करत आहेत.
COMMENTS