भोपाळ (मध्य प्रदेश): मुरैनामध्ये एका विवाहित महिलेवर तब्बल नऊ जणांनी सामूहिक बलात्काराचा धक्कादायक प्रकार घडला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल ...
भोपाळ (मध्य प्रदेश): मुरैनामध्ये एका विवाहित महिलेवर तब्बल नऊ जणांनी सामूहिक बलात्काराचा धक्कादायक प्रकार घडला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत.
मुरैनाचे सिव्हील लाइन पोलिस ठाणे हद्दीत महिलेने (वय २४) सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. तिने सांगितले की, 18 फेब्रुवारी रोजी ती एका लग्नात गेली होती. त्यावेळी चार जणांनी अपहरण केलं. यानंतर 9 जणांनी सामूहिक बलात्कार केला. बलात्कारानंतर भिंडमध्ये 4 लाखात मजुरी करण्यासाठी विकण्यात आले. 25 मे रोजी आरोपींच्या तावडीतून पळ काढला आणि पोलिसांकडे गेली. यानंतर पोलिसांनी दोषींविरोधात बलात्कार आणि मानवी तस्करीसह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दीपू गुर्जर, वीरेंद्र गुर्जर, प्रताप गुर्जर, गजेंद्र गुर्जर आणि जीतू गुर्जर लहर गावातील रहिवासी आहेत. आरोपी पंकज गुर्जर, सुनील गुर्जर आणि पप्पू खटीक कटमा गावातील रहिवासी आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपी फरार आहे. तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर आली. महिला 18 फेब्रुवारीपासून बेपत्ता होती. पण, तिच्या पतीने याबाबत पोलिसात तक्रार दाखल केली नव्हती. पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
COMMENTS