प्रतिनिधी : शरद शिंदे आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुराळे ता. जुन्नर जि. पुणे येथे नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत तसेच शाळापूर्व तयारी मेळ...
प्रतिनिधी : शरद शिंदे
आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुराळे ता. जुन्नर जि. पुणे येथे नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत तसेच शाळापूर्व तयारी मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी मिरवणूक व वाद्यांच्या गजरात विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांचे औक्षण करून गुलाबपुष्प, फुगे, बिस्किटे, पाठ्यपुस्तके, गणवेश देवून विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले. यावेळी मुंबईचे प्रसिद्ध व्यापारी मा.उत्तमशेठ मातेले यांच्याकडून सर्व विद्यार्थ्यांना वह्या व मा. बन्सीशेठ चतुर व मा. देवरामशेठ चतुर यांच्याकडून सर्व विद्यार्थ्यांना दप्तरांचे वाटप करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांना कार्यक्रम प्रसंगी दुपारी लाडूचे गोड जेवण देण्यात आले.
यावेळी इयत्ता पहिलीच्या वर्गाचा शाळापूर्व तयारी
मेळावा उत्साहात संपन्न झाला. सर्व विद्यार्थी आज अतिशय उत्साही आनंदाच्या
वातावरणात होते. या कार्यक्रम प्रसंगी विद्यार्थ्यांची १००% उपस्थिती होती.
यावेळी पालक,
ग्रामस्थ व पदाधिकारी
मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन शाळेतील शिक्षक खंडेराव ढोबळे, पंढरीनाथ
उतळे, मंगल मरभळ व देवराम भांगे यांनी केले.
COMMENTS