पुणेः शिक्रापूर (ता. शिरुर) येथे वारंवार होणाऱ्या वादातून एकाने पत्नीचा गळा आवळून खून केल्याची घटना घडली आहे. मात्र , सहा वर्षाच्या मुलामु...
पुणेः शिक्रापूर (ता. शिरुर) येथे वारंवार होणाऱ्या वादातून एकाने पत्नीचा गळा आवळून खून केल्याची घटना घडली आहे. मात्र, सहा वर्षाच्या मुलामुळे सदर खुनाला वाचा फुटली आहे.
शिक्रापूर (ता. शिरुर)
येथील बजरंगवाडी येथे राहणाऱ्या कांचन नरवाडे या महिलेचा पती व महिलेमध्ये वारंवार
वाद होत होता. २ जून रोजी सकाळच्या सुमारास झालेल्या वादातून सचिन याने कांचनचा
शर्टाने गळा आवळून खून केला. त्यांनतर सदर महिलेने गळफास घेतल्याची अफवा केली.
शिक्रापूर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन आतकरे, पोलिस नाईक संतोष
मारकड यांनी घटनास्थळी जात महिलेचा मृतदेह शवविच्छेदन साठी ग्रामीण रुग्णालय येथे
हलवला.
दरम्यान, मृत कांचन नरवाडे या
महिलेचे आई, वडील, भाऊ सदर ठिकाणी आले होते. मृत महिलेच्या सहा वर्षीय मुलाकडे त्यांनी चौकशी
केली असता वडिलांनीच आईचा शर्टाने गळा आवळला असल्याचे त्याने सांगितले. त्यामुळे
महिलेच्या खुनाला वाचा फुटली. सदर घटनेत कांचन सचिन नरवाडे (रा. बजरंगवाडी
शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे मूळ रा. सावंगी अवघडराव ता. भोकरदन जि. जालना) या
महिलेचा मृत्यू झाला आहे.
याबाबत विश्वजित
दादाराव मोरे (वय २७ वर्षे रा. देहेड पोस्ट दानापूर ता. भोकरदन जि. जालना) यांनी
शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. शिक्रापूर पोलिसांनी सचिन मधुकर
नरवाडे (रा. बजरंगवाडी शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे मूळ रा. सावंगी अवघडराव ता.
भोकरदन जि. जालना) याचे विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. सदर
गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली
सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन अतकरे हे करत आहेत.
COMMENTS