चंद्रपूरः चंद्रपूर शहरातील बहुचर्चित खुनाच्या गुन्हयातील तीन मुख्य आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. याबाबत पोलिस पुढील तपास कर...
चंद्रपूरः चंद्रपूर शहरातील बहुचर्चित खुनाच्या गुन्हयातील तीन मुख्य आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. याबाबत पोलिस पुढील तपास करत आहेत.
14/06/22
रोजी रात्री 8:30 वा ते 09:00 वा दरम्यान पोलिस नियंत्रण कक्ष येथील डायल 112 कॉल वरून माहिती प्राप्त झाली की, ज्युबली शाळेव्या मागे
पडक्या इमारतीचे वर एक चिकटपट्टीने गुडलेले पुरूष जातीचे प्रेत पडून आहे, अशा माहितीवरून पोलिस
नियंत्रण कक्ष, चंद्रपूर यानी स्थानिक गुन्हे शाखा,
चंद्रपूर, पोलिस स्टेशन रामनगर, पोलिस स्टेशन चंद्रपूर शहर यांना माहिती देण्यात आली. संबंधीत पोलिस
स्टेशनचे प्रमुख व स्थाानिक गुन्हे शाखेचे प्रमुख तात्काळ घटनास्थळी पोहचले असता
ज्युबली शाळेचे मार्गे जिल्हा परीषद क्वार्टर जवळील शिक्षण भवनाचे जुण्या व पडक्या
ईमारतीचे स्लॅबवर हातापायाला व मानेला चिकपट्टी गुंडाळलेले एक 25 ते 30 वयोगटातील पुरूषाचे
प्रेत दिसून आले. प्रथम दर्शनी पाहिले असता सदर व्यक्तीचा खून झाल्याचे दिसून आले.
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस अधीक्षक,
चंद्रपूर यांनी तात्काळ ओळख पटवून त्याचे मारेकरी शोधण्याच्या सुचना
स्थानिक गुन्हे शाखा व पोलिस स्टेशन चंद्रपूर शहर यांना केल्या.
सदर घटनेचे
गांभीर्य ओळखून या बाबत पोलिस निरीक्षक,
खाडे, स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांनी त्याचे अधिनस्त असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक, जितेंद्र बोबडे व
सहाय्यक पोलिस निरीक्षक, संदीप कापडे यांचे दोन पथक तयार करून मयत व्यक्तीची ओळख व आरोपी शोध
संबधाने त्यांना सुचना देण्यात आल्या. सदर पथक मयत व्यक्तीची ओळख व त्यास
मारणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत असताना गोपनिय बातमीदारांकडून माहिती मिळाली की, यातील मृत्यूमुखी पडलेला
राहूल विलास ठक (वय 30, रा. हैद्राबाद बँके जवळ पेठ वार्ड,
राजूरा जिल्हा चंद्रपूर) हा असल्याचे निष्पन्न करण्यात यश आहे. त्यानंतर
पोलिस स्टेशन चंद्रपूर शहर येथे अप क्र. 327/
2022 कलम 302,
201 भादवी अन्वये गुन्हा नोद करण्यात आला.
सदर गुन्हयातील
संशईत व्यक्तीचा शोध घेणे चालू केले असता कोणताही ठोस व सबळ पुरावा आरोपींनी
घटनास्थळावर ठेवला नव्हता. आरोपीचे शोध संबंधाने सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप
कापडे, स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांना
मुखबीरव्दारे खबर मिळाली की, राहूल हा डॉ. चिल्लरवार यांचे दवाखान्यात गाडी चालक म्हणून काम करीत होता.
तेव्हा अंदाजे 1 वर्षापुर्वी त्याचे एका महिले सोबत मोबाईलवर काहीतरी मेसेज केले होते.
त्यावरून त्यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर महिलेच्या दोन मुलांनी त्यास मारहाण
केली होती. गोपनिय माहिती मिळाले वरून स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सदर महिलेचा शोध
घेवून तिचे घरी जावून तिला व तिचे पतीला तिचे मुला बाबत विचारपूस केली. लहान मुलगा
घरी मिळून आला व मोठा मुलगा हा नाशिक येथील एम.आय.डी.सी मध्ये कामाला असून पत्नीसह
नाशिक येथे वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली. त्यावरून मुलगा वैभव राजेश डोंगरे
हा सध्या नाशिकला आहे किंवा कसे या बाबत माहिती घेतली असता तो मागील तिन
दिवसापासून नाशिक वरून चंद्रपूरला आल्याची माहिती मिळाली.
चंद्रपूर येथील
त्याचे जवळचे मित्र कोण या बाबत माहिती घेतली असता त्याचा मित्र संदीप उर्फ गुड्डू
राजकुमार बर्लेवार (वय 30 वर्षे रा इंदीरा नगर चंद्रपूर) यास ताब्यात घेवून विचारपूस केली असता तो
कोणतेही समाधान कारक उत्तरे देत नव्हता. विचारपूस चालू असतानाच गोपनिय सुत्रांकडून
विश्वसनिय माहिती मिळाली की, वैभव डोंगरे हा त्याचे एका साथीदारासह नाशिकला जाणार आहे. अशी खात्रीशीर
माहिती प्राप्त झाले वरून त्यांचा शोध घेवून त्यांना ताब्यात घेण्यात आले वैभव
डोंगरे व त्याचे सोबत असलेला त्याचा मित्र कार्तीक रमेश बावणे (वय 25 वर्षे रा. आंबेडकर चौक
सिंदेवाही) याना विचारपूस केली असता वैभव डोंगरे याने सांगीतले की, त्याचा मागील 1 वर्षा आधी झालेल्या
वादावरून त्याचे साथीदार नामे 1) संदीप उर्फ गुड्डू राजकुमार बर्लेवार (वय 30 वर्षे रा. इंदीरा नगर चंद्रपूर) व 2) कार्तीक रमेश बावणे
(वय 25 वर्षे रा. आंबेडकर चौक
सिंदेवाही) याचे मदतीने रात्री दरम्यान ज्युबली शाळा 3 चे मागे जिल्हा परीषद
क्वार्टर जवळील शिक्षण भवनावे जुण्या व पडक्या इमारतीचे स्लॅपवर मयत राहूल विलास
तक (वय 30 वर्षे रा हैद्राबाद
बैंके जवळ मेठ वार्ड, राजूरा जि.चंद्रपूर) यास नेवून त्याला त्या ठिकाणी दारू पाजून त्याचा गळा
आवळून व डोक्यावर दारूच्या काचेचे बॉटलने वार करून जिवानीशी ठार मारले. जवळ
असलेल्या चिकटपट्टीने बांधून प्रेत त्याच ठिकाणी ठेवून निघून गेले. सदर गुन्हयात
नमुद तिन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलिस
स्टेशन चंद्रपूर शहर हे करीत आहे.
सदरची कार्यवाही
प्रभारी पोलिस अधीक्षक राहुल माकणीकर,
शेखर देशमुख, प्रभारी अप्पर पोलिस अधीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा
चंद्रपुर चे सहाय्यक पोलिस निरीक्षक जितेंद्र बोबडे यांचे नेतृत्वात स्थानिक
गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप कापडे, स फौ. राजेंद्र खनके, पो. हवा स्वामी चालेकर, संजय आतकुलवार, नितीन साळवे, सुरेद्र मोहंती, ना पो कॉ सुभाष
गोहोकार, चंदू नागरे, संतोष येलपुलवार, गणेश मोहुर्ले पो.कॉ
सतिश बगमारे, कुंदन बावरी, रवि पधरे, गोपिनाथ नरोटे, प्राजल झिलपे यांनी केली.
COMMENTS