विशेष प्रतिनिधी ः प्रा. निलेश आमले. ( सर ) क्राईमनामा Live : श्री शिव छत्रपती महाविद्यालयातील आय क्यू सी व राष्ट्रीय सेवा योजना (NSS) या वि...
विशेष प्रतिनिधी ः प्रा. निलेश आमले. ( सर )
क्राईमनामा Live : श्री शिव छत्रपती महाविद्यालयातील आय क्यू सी व राष्ट्रीय सेवा योजना (NSS) या विभागाच्या संयुक्त विद्यमाने संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त एक दिवसीय स्वच्छता मोहीम पुणे येथील निवडूंगा विठ्ठल मंदिर या ठिकाणी राबवण्यात आली.
या मंदिर
परिसरातील स्वच्छता राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवकांनी केली. या स्वच्छतेदरम्यान
निघालेल्या कचऱ्याच्या एकूण 25 पिशव्या संकलित करून कचरा
गाडीमध्ये टाकण्यात आल्या.
या मोहिमेसाठी
महाविद्यालयाचे मा. प्राचार्य डॉ. उत्तम शेलार, अध्यक्ष प्रतिनिधी श्री विलास कुलकर्णी,
उपप्राचार्य डॉ.दीपेंद्र उजगरे यांचे मार्गदर्शन लाभले.
या संपूर्ण
मोहिमेचे नियोजन एन.एस.एस कार्यक्रम अधिकारी प्रा. विक्रम रसाळ व प्रा. डॉ. सौ. वंदना
नढे यांनी केले. त्याचबरोबर या मोहिमेमध्ये एकूण 11 स्वयंसेवकांनी सहभाग नोंदविला.
COMMENTS