अॅड.इंद्रभान गुंजाळ. क्राईमनामा Live : जुन्नर येथे नवीन न्यायालयाचे उद्घाटन दिनांक २५ जून २०२२ रोजी माननीय न्यायमूर्ती अभय ओक (सर्वोच्च न्...
अॅड.इंद्रभान गुंजाळ.
क्राईमनामा Live : जुन्नर येथे नवीन न्यायालयाचे उद्घाटन दिनांक २५ जून २०२२ रोजी माननीय न्यायमूर्ती अभय ओक (सर्वोच्च न्यायालय, दिल्ली) व माननीय न्यायमूर्ती नितीन जामदार यांच्या हस्ते पार पडले तसेच जुन्नर येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी व दिवाणी न्यायधीश मा. प्रताप सपकाळ साहेब व मा.विशाल घोरपडे साहेब हे हि उपस्थित होते त्याचप्रमाणे जुन्नर वकील संघातील सर्व वकील बंधू भगिनी यांच्या उपस्थितीत हा ऐतिहासिक सोहळा पार पडला.
उद्घाटन प्रसंगी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांनी नविन जुन्नर न्यायालयात काम करणाऱ्या सर्व वकील बांधवांनी न्यायदानाचे पवित्र काम करावे तसेच इ-कोर्ट चा वापर वकील व पक्षकाराणी जरूर करावा तसेच जुन्या न्यायमंदिराचे रुपांतर संग्रहालयात करावे त्यात सर्व जुन्नर मधील ऐतिहासिक ठेवा जिवंत ठेवावा असे सांगितले. तसेच वकिलांनी न्याय देण्याचे पवित्र कार्य करावे. व जास्तीत जास्त केसेस निकाली काढाव्यात. त्यामुळे पक्षकारांना समाधान मिळेल.
शेवटी समारोप करताना जिल्हा न्यायधीश संजय देशमुख यांनी सर्व वकील बंधू भगिनी, जुन्नर बारचे अध्यक्ष, पोलीस अधिकारी, शासकीय अधिकारी यांचे मनापासून आभार मानले आणि उपस्थित सर्व पत्रकार बंधू भगिनीचे जे योगदान आहे त्याबद्दल आभार व्यक्त केले.
COMMENTS