क्राईमनामा Live : आग्रा (उत्तर प्रदेश): आग्रा शहरातील ओम श्री प्लॅटिनम अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावर राहणाऱ्या फॅशन आणि फूड ब्लॉगर रिति...
क्राईमनामा Live : आग्रा (उत्तर
प्रदेश): आग्रा शहरातील ओम श्री प्लॅटिनम अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावर
राहणाऱ्या फॅशन आणि फूड ब्लॉगर रितिका सिंह (वय ३०) हिचे हात पाय बांधून खाली
फेकल्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
रितिका पती आकाश
गौतमला सोडून गेल्या तीन वर्षांपासून फेसबुक फ्रेन्ड विपुल अग्रवाल याच्यासोबत
लिव्ह इनमध्ये राहत होती. पोलिसांनी याप्रकरणी रितिकाचा पती आकाश गौतम आणि
त्याच्यासोबत आलेल्या दोन महिलांसोबतच तिचा फेसबुक फ्रेन्ड विपुल यालाही ताब्यात
घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
रितिका ही विपुल अग्रवालसोबत लिव इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. विपुलची
पत्नीसोबत घटस्फोटाची केस सुरू आहे. शुक्रवारी दुपारी 12 वाजताच्या सुमारात
फ्लॅटमध्ये तीन तरूण आणि दोन महिला आल्या होत्या. त्यानंतर अपार्टमेंटमधील काही
लोकांना काहीतरी पडल्याचा आवाज आला आणि बाहेर येऊन पाहिले तर महिला रक्ताच्या
थारोळ्यात पडली होती. त्यांनी लगेच पोलिसांना सूचना दिली. याप्रकरणात सहभागी दोन
महिला सुनीता आणि सुशीलासोबत आकाश गौतम आणि विपुलला ताब्यात घेतले आहे. याबाबत
पुढील तपास सुरू आहे.
रितिकाचे (मूळ
रा. गाजियाबाद) 2014 मध्ये आकाश गौतमसोबत लव्ह मॅरेज झाले होते. लग्नानंतर दोघेही
फिरोजाबादमध्ये राहत होते. पती आकाश कोचिंग क्लासेस घेत होता. त्यानंतर ते
आग्र्याला राहायला आले. 2017 मध्ये फेसबुकवर रितिकाची मैत्री अग्रवालसोबत झाली. विपुल आधीच विवाहित
होता. आकाशला दोघांच्या नात्याचा संशय आला. यावरून पती-पत्नीमध्ये भांडण होत होती.
यानंतर 2019 मध्ये रितिका पती
आकाशला सोडून विपुलसोबत लिव इनमध्ये राहू लागली होती. आकाश शुक्रवारी 11 वाजता दोन महिलांना
सोबत घेऊन ओम श्री प्लॅटिनम अपार्टमेंटमध्ये आला आणि रितिकाने दरवाजा उघडताच तिला
मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्याने आपल्या मित्रांसोबत मिळून विपुलचे हाय पाय
बांधून त्याला बाथरूममध्ये बंद केले. यानंतर पुन्हा रितिकाला मारहाण केली.
विपुलने
पोलिसांना सांगितले की, 'आकाश आणि त्याच्या काही साथीदारांनी रितिकाचे हात पाय बांधले आणि गळ्यात
दोरी बांधून तिला बाल्कनीतून खाली फेकले. मला सुद्धा ते लोक मारणार होते. पण
बाथरूमचा दरवाजा तोडून आरडाओरड सुरू केल्यामुळे आजूबाजूचे नागरिक जमा झाले.
नागरिकांना पाहून ते पळू लागले होते. मात्र,
नागरिकांनी आकाश आणि दोन महिलांना जागेवरच पकडले.
COMMENTS