छतरपूर (मध्य प्रदेश): जिल्हा रुग्णालय प्रशासनाने शववाहिका देण्यास नकार दिल्यामुळे एका पित्याला त्याच्या लहान मुलीचा मृतदेह खांद्यावर घेऊन ...
छतरपूर (मध्य प्रदेश): जिल्हा रुग्णालय प्रशासनाने शववाहिका देण्यास नकार दिल्यामुळे एका पित्याला त्याच्या लहान मुलीचा मृतदेह खांद्यावर घेऊन पाच किलोमीटर चालत जावे लागल्याची घटना घडली आहे.
माणुसकीला काळिमा आणि लाज वाटणारी घटना उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.
एक पिता मुलीचा मृतदेह खांद्यावर घेऊन पायी चालत जात होता. रस्त्याच्या कडेला उभे असलेले नागरिक फोटो आणि व्हिडिओ काढत होते. मात्र, त्यांच्या मदतीसाठी कोणीही पुढे आले नाही. दमोह येथील जिल्हा रुग्णालयात राधा (वय ४) हिचा मृत्यू झाला होता. तिचे वडील लक्ष्मण हे अतिशय गरीब आहेत. रुग्णालय प्रशासनाने त्यांना शववाहिका देण्यास नकार दिला. बक्सवाहा नगर पंचायतीमध्येही त्यांना कुणीच मदत केली नाही. अखेर त्यांनी बसमध्ये एका गोधडीत चिमुकलीचा मृतदेह गुंडाळून बक्सवाहापर्यंत आणले. तिथून पुढे त्यांचे गाव ५ किलोमीटर अंतरावर आहे. तिथे मृतदेह नेण्यासाठीही कुणी त्यांना मदत केली नाही. अखेर लक्ष्मण त्यांचे बंधू व वडील तिचा मृतदेह खांद्यावर तेवढे अंतर पायी चालून घरी घेऊन आले.
दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर जागे झालेल्या अधिकाऱ्यांनी शववाहिका पाठविली. परंतु, तोपर्यंत ते गावाजवळ पोहचले होते. जिल्हाधिकारी राहुल सिलाडिया यांनी घटनेची गंभीर दखल घेतली असून, चौकशीचे आदेश दिले आहेत.
COMMENTS