नागपूर : जावयाने मध्यरात्री सासू-सासऱयाची कुऱ्हाडीनं हत्या केल्याची धक्कादायक घटना अमर नगर भागात घडली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. आ...
नागपूर : जावयाने मध्यरात्री सासू-सासऱयाची कुऱ्हाडीनं हत्या केल्याची
धक्कादायक घटना अमर नगर भागात घडली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. आरोपीने
पत्नी आणि मुलीलाही गंभीर जखमी केले आहे.
नरमू यादव असे
आरोपीचे नाव आहे. त्याने भगवान रेवारे व सासू पुष्पा रेवारे यांची कुऱ्हाडीने
हत्या केली. यावेळी आरोपीची पत्नी कल्पना यादव आणि मुलगी मुस्कान या गंभीर जखमी
झाल्या आहेत. आरोपीचे मागील दोन-तीन दिवसांपासून पत्नीसोबत भांडण सुरू होते.
शनिवारी (ता. २५) रात्री 12.30 च्या सुमारास त्याने पत्नीशी भांडण सुरु करून मारहाण करण्यास सुरवात केली.
भांडण सोडवायला आधी सासरा धावला तर त्याला कुऱ्हाडीने ठार केले नंतर घरातून
पत्नीला ओढत बाहेर काढले. सासू भांडण सोडवायला धावली तर घरासमोर रस्त्यावर सासूला
सुद्धा कुऱ्हाड व दगडाने मारून ठार केले. पत्नीच्या खांद्यावर सुद्धा कुऱ्हाडीने
वार केला व दगडाने डोक्यावर मारहाण केली.
मोठा गोंधळ
झाल्यानंतर शेजारी राहणारे भांडण सोडविण्याचा प्रयत्न करू लागल्यानंतर त्यांच्या
मागे सुद्धा मोठा दगड घेऊन धावला. यानंतर आरोपी स्वतः चे रक्ताने माखलेले कपडे
बदलून घरातून पळून गेला. गावकऱ्यांनी एमआयडीसी पोलिसांना माहिती दिल्यानंतर
पोलिसांनी त्याला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत.
COMMENTS