सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर ) क्राईमनामा Live : समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्युशन्स बेल्हे ( बांगरवाडी ) येथील शैक्षणिक संकुलात राष्ट्रीय...
सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर )
क्राईमनामा Live : समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्युशन्स बेल्हे ( बांगरवाडी ) येथील शैक्षणिक संकुलात राष्ट्रीय सेवा योजना, विद्यार्थी विकास मंडळ यांच्या संयुक्त विभागाने आयोजित आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त संकुलातील इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक, फार्मसी, बी सी एस, ज्युनियर कॉलेज, गुरुकुल या विभागातील शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
योग प्रशिक्षक डॉ.राजाभाऊ ढोबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सूर्यनमस्कार, योगासने, प्राणायाम, ध्यान व प्रार्थना, हास्यासन, सुखासन, गरुडासन, ताडासन, शीर्षासन, धनुरासन, वज्रासन, भुजंगासन, कपालभाती, भसरिका, अनुलोभ विलोभ आदीचे प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.
वेगवेगळ्या प्रकारच्या दुर्धर व्याधी योगासनामुळे नष्ट होण्यास मदत होते.योग हि एक साधना असून सातत्य पूर्ण सरावाने मनुष्याच्या जीवनात चांगल्या प्रकारचे अमुलाग्र बदल होऊ शकतात. योगामुळे स्मरण शक्ती वाढण्यास मदत होते. शरीरातील रक्त प्रवाह सुरळीत होण्यास मदत होते तसेच प्राणायाम केल्यामुळे श्वसनाचे विकार बरे होण्यास मदत होते. गुडगे दुखी, पाठ दुखी, कंबर दुखी या पासून आराम मिळतो. योग साधनेचे महत्व सांगताना प्रा.प्रदीप गाडेकर म्हणाले की, योग ही शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी आचरणात आणली जाणारी प्राचीन भारतीय प्रक्रियापद्धती आहे. यम, नियम, योगासन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी ही योगाची आठ अंगे आहेत. प्राणायामामुळे शरीर व मन शुद्ध होऊन मनाची एकाग्रता वाढते. अतिरिक्त चरबी कमी करण्यास मदत होते. ध्यानधारणे मुळे मनाला शांती मिळण्यास मदत होते. नियमित वज्रसनामुळे व प्राणायाम, कपालभाती, भसरीका केल्याने आजारापासून बचाव होतो.
यावेळी अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ.अनिल पाटील, तंत्रनिकेतन चे प्राचार्य प्रा.अनिल कपिले, बी सी एस चे प्राचार्य डॉ.लक्ष्मण घोलप, ज्युनियर च्या प्राचार्या वैशाली आहेर, गुरुकुल चे प्राचार्य सतीश कुऱ्हे, फार्मसी चे प्राचार्य डॉ.संतोष घुले, डॉ.सुभाष कुंभार आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन रासेयो अधिकारी प्रा.विपुल नवले, क्रीडा शिक्षक डॉ.राजाभाऊ ढोबळे, डॉ.जाधव यांनी केले.
COMMENTS