पुणेः कावळपिंप्री येथील रोहिदास पाबळे खुन प्रकरणातील मुख्य सुत्रधार दिलीप आटोळे याला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. ९/३/२०२२ रोज...
पुणेः कावळपिंप्री येथील रोहिदास पाबळे खुन प्रकरणातील
मुख्य सुत्रधार दिलीप आटोळे याला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे.
९/३/२०२२ रोजी कावळ पिंपरी येथील
रोहिदास पाबळे याचा जुन्या भांडणाचा राग मनात धरून दत्ता भाकरे व त्याचे सोबत इतर
साथीदारांनी मिळून रोहिदास पाबळे याचेवर रात्रीचे वेळी अचानक हल्ला केला होता.
स्थानिक गुन्हे
शाखेच्या पथकाला दिलीप आटोळे हा त्याचे पत्नीसह करंजाडे पनवेल येथे असले बाबत
गोपनीय बातमीदार व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे माहिती मिळाली. सदर ठिकाणी जाऊन
दिलीप आटोळे याचा शोध घेतला असता अखेरीस करंजाडे पनवेल या ठिकाणी तो मिळून आला.
त्यास ताब्यात घेण्यात आले असून, पुढील तपास कामी
नारायणगाव पोलिस स्टेशनचे ताब्यात देण्यात आले आहे. सदर आरोपीवर यापूर्वी देखील
खून, खंडणी, मारामारी यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
सदरची कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलिस अधीक्षकमितेश घट्टे, उपविभागीय पोलिस अधिकारी जुन्नर विभाग मंदार जावळे, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक शेळके, पो.स ई गणेश जगदाळे, स.फौ तुषार पंदारे, पो.हवा जनार्दन शेळके, पो.हवा राजू मोमीन, पो.ना मंगेश थिगळे, पो.काँ दगडू विरकर यांनी केली आहे.
COMMENTS