प्रतिनिधी : शिंदे नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आले. दिनांक 15 जून 2022 रोजी जिल्हा परिष...
प्रतिनिधी : शिंदे
नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात विद्यार्थ्यांच्या
हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आले. दिनांक 15 जून 2022 रोजी जिल्हा परिषद
प्राथमिक शाळा शिंदे येथे इयत्ता पहिली या वर्गाचा नवीन प्रवेशोत्सव अत्यंत
उत्साहात साजरा करण्यात आला. इयत्ता पहिलीच्या सर्व विद्यार्थ्यांना फेटे बांधून
व गुलाब पुष्प देऊन त्यांची वाजतगाजत
मिरवणूक काढण्यात आली.
या दिवशी सर्व
मुलांना नवीन गणवेश व पुस्तके वाटप करण्यात आली. त्याचबरोबर या दिवशी प्रत्येक
मुलाने एक झाड लावावे असा संकल्प करण्यात आला व शाळेच्या आवारात दिनांक 15 जून
2022 रोजी प्रत्येक मुलांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. त्याचबरोबर मुलांना
विविध विषयांची गोडी लागावी म्हणून विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली. कार्यक्रमाच्या निमित्ताने गावातील सरपंच
उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच विविध महिला मंडळी पालक वर्ग उपस्थित होते .
कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन मुख्याध्यापक श्री भरत बोचरे सर व सौ स्वाती
घोडे मॅडम यांनी केले. शेवटी विद्यार्थ्यांना मिष्ठान्न देऊन कार्यक्रमाची सांगता झाली
COMMENTS