विशेष प्रतिनिधी : प्रा. निलेश आमले ( सर ) क्राईमनामा Live : श्री शिवछत्रपती महाविद्यालयात दिनांक १४ जुन २०२२ रोजी पिरामल फार्म...
विशेष प्रतिनिधी : प्रा. निलेश आमले ( सर )
क्राईमनामा Live : श्री शिवछत्रपती महाविद्यालयात दिनांक १४ जुन २०२२ रोजी पिरामल फार्मा सोल्यूशन ग्रुप, हेमो फार्मासुटीकल्स प्रा. लि. कंपनी यांच्यामार्फत कॅम्पस मुलाखतीचे आयोजन
करण्यात
आले.
त्यातून
विद्यार्थ्यांना फार्मासुटीकल्स कंपनीमध्ये उत्पादन
विभागामध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे. संस्थेचे
मा. अध्यक्ष अॅड.संजय शिवाजीराव काळे साहेब यांच्या
शुभ हस्ते आलेल्या पाहुण्याचे पुष्पगुच्छ देवून स्वागत व सत्कार करण्यात आले. मुलाखत घेण्यासाठी पिरामल फार्मा सोल्यूशन ग्रुप, हेमो फार्मासुटीकल्स प्रा. लि. कंपनी चे मा. अतुल
कोल्हे (अस्सिस्टंट मॅनेजर), मा. अभिजीत
देसाई (अस्सिस्टंट प्रॉडक्शन मॅनेजर), मा. पुनीत
शुक्ला (एच.आर. हेड), मा. रसिका
कदम (एच.आर. एक्झिक्युटिव), मा. ऋतुजा केसरकर (एच.आर.
ट्रेनी) इत्यादि मान्यवर उपस्थित होते.
मा.
पुनीत शुक्ला (एच.आर. हेड)
यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना हेमो फार्मासुटीकल्स प्रा. लि. कंपनीबाबत
माहिती दिली. मा.
रसिका कदम (एच. आर. एक्झिक्युटिव) यांनी
विद्यार्थ्यांना मुलाखतीच्या संदर्भात मार्गदर्शन केले. तसेच ऋतुजा केसरकर (एच.आर. ट्रेनी) यांनी विद्यार्थ्यांची मुलाखतीसाठी
आवश्यक असणारी माहिती भरून घेतली.
या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयातील प्लेसमेंट विभागाचे प्रमुख प्रा. ए. जे. दुशिंग यांनी मा. प्र. प्राचार्य डॉ. उत्तम शेलार सर, मा. उपप्राचार्य डॉ. डी. व्ही. उजागरे सर व मा. अध्यक्ष प्रतिनिधी प्रा. व्ही. बी. कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनाखाली केले. मा. प्र. प्राचार्य डॉ. उत्तम शेलार सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले, सूत्रसंचालन प्रा. ए. जे. दुशिंग यांनी केले तर आभार प्रा. एस. एस. थोरवे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी व्यवसाय मार्गदर्शन व प्लेसमेंट विभागातील प्रा. डॉ. विनायक लोखंडे आणि रसायनशास्त्र विभागातील प्रा. भगत, प्रा. कदम, प्रा. घोडेकर, प्रा. शेख मॅडम, प्रा. बोरकर मॅडम, प्रा. गाढवे मॅडम यांचे सहकार्य लाभले. या मुलाखतीमध्ये ६३ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला त्यातील ३१ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. यामध्ये श्री शिव छत्रपती महाविद्यालयातील १४ विद्यार्थी तसेच आण्णासाहेब आवटे महाविद्यालय मंचर मधील ०९ विद्यार्थी, आण्णासाहेब वाघिरे महाविद्यालय ओतूर मधील ३ विद्यार्थी, बाळासाहेब जाधव महाविद्यालय आळे मधील ३ विद्यार्थी, अहमदनगर महाविद्यालतील १ विद्यार्थी व डी. वाय. पाटील महाविद्यालय पुणे येथील ०१ विद्यार्थी ई. विद्यार्थ्यांचा समावेश आहे. निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे मा. अध्यक्ष अॅड.संजय शिवाजीराव काळे साहेब यांच्याकडून हार्दिक अभिनंदन व त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा.
या कार्यक्रमासाठी श्री सोनवणे, श्री. कांबळे, श्री. कुमार,
श्री. जाधव, श्री राजू गवळी, कु. कोमल
व श्री. मितेश गाडेकर यांचे सहकार्य लाभले.
COMMENTS