चेन्नई (तमिळनाडू): एकतर्फी प्रेमातून एका युवकाने अकरावीतील विद्यार्थिनीवर तब्बल 14 वेळा वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्रिचीजवळील ...
चेन्नई (तमिळनाडू): एकतर्फी प्रेमातून एका युवकाने अकरावीतील विद्यार्थिनीवर तब्बल 14 वेळा वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्रिचीजवळील अंतिकुलम येथे ही घटना घडल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.
केशवन हा 22 वर्षीय युवक तिच्यावर एकतर्फी प्रेम करत
होता. तिने नकार दिल्यानंतर तो संतापला आणि हल्ला करून तो फरार झाला. याबाबत पोलिस
पुढील तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'केशवन असे या आरोपीचे
नाव आहे. तो काही दिवसांपूर्वीच जेलमधून सुटला होता. त्यानंतर त्याने पुन्हा
विद्यार्थिनीचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. घटनेच्या दिवशी परीक्षा संपल्यानंतर
मुलगी आपल्या नातेवाईकाच्या घरी जात होती. अंतिकुलम रेल्वे पूलाजवळून जात असताना
आरोपी केशवन याने तिला अडवले आणि प्रेमाबद्दल सांगितले. पण पीडितेनं आरोपीच्या
प्रेमाला नकार दिला. यावेळी संतापलेल्या आरोपीने पीडितेला धारदार चाकूने तब्बल 14 वेळा भोसकले आणि
घटनास्थळावरून पळून गेला.'
केशवन याच्यावर संबंधित मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. पण तुरुंगातून सुटल्यानंतर त्याने पुन्हा पीडित मुलीचा पाठलाग सुरू केला होता. तिने नकार देताच आरोपीने तिच्यावर हल्ला केला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.
COMMENTS