पुणे: बिहार मधील भादलपुर येथील आय टी आयच्या ८० विद्यार्थ्यांना नोकरीचे आमिष दाखवुन बोगस जॉयनिंग ऑफर लेटर देऊन फसवणुक करण्यात आल्याचा प्रका...
पुणे: बिहार मधील भादलपुर येथील आय टी आयच्या ८० विद्यार्थ्यांना नोकरीचे आमिष दाखवुन बोगस जॉयनिंग ऑफर लेटर देऊन फसवणुक करण्यात आल्याचा प्रकार ताजा असतानाच परत रांजणगाव औद्योगिक वसाहतीत LG कंपनीत कामाला लावण्याच्या नावाखाली तीन भामट्यांनी नऊ कामगारांना फसविल्याची घटना घडली असुन बाजीराव बाळु नागरगोजे, शुभम अरुण भुजबळ दोघे सध्या (रा.रांजणगाव, लांडेवस्ती, ता. शिरुर, जि. पुणे) आणि विशाल चोपडे (रा. उरुळी कांचन, ता. हवेली, जि. पुणे) या तीन भामट्यां विरुद्ध वैभव शशांकराव फुसाटे या युवकाने रांजणगाव MIDC पोलीस ठाण्यात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत रांजणगाव MIDC पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एप्रिल महिन्यात
फिर्यादीच्या मोबाईलवर नोकरीच्या संदर्भात एक जाहीरात आली होती. त्यात LG कंपनीत पर्मनंट नोकरी तसेच १३ ते १८ हजार पगार असा मजकुर होता. त्यात संबंधित व्यक्तींचे मोबाईल नंबर देण्यात आले होते. फिर्यादीला नोकरीची गरज असल्याने त्याने जाहीरातीतल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधुन नोकरी संदर्भात चौकशी केली होती.
फिर्यादीला नोकरीची गरज असल्याने दि १५ मे रोजी त्याने जाहिरातीमधील मोबाईल नंबरवरती संपर्क केला असता समोरुन एक महिला फोनवर बोलत होती बोलली. त्यावेळी तिने मी LG कंपनीमधुन बोलत असल्याचे सांगुन तुम्हाला LG कंपनीत नोकरी करायची असल्यास आधारकार्ड, दोन फोटो आणि २ हजार रुपये घेवुन या तसेच सोबत तुमचे कोणी मित्र, नातेवाईकास नोकरीची आवश्यकता असल्यास त्यांना देखील सोबत घेवुन या असे सांगुन, रांजणगाव MIDC मधील राजमुद्रा चौकामध्ये आल्यावरती फोन करा. त्याठिकाणी आल्यानंतर कंपनीचे सुपरवायझर तुम्हाला नेण्यासाठी येतील असे सांगितले.
त्यानंतर (दि. २०) मे रोजी सकाळी १०:३० च्या सुमारास फिर्यादी त्याच्या एका मित्रासह राजमुद्रा चौकात आला. त्यानंतर एका लाल रंगाच्या ब्रिजा गाडी क्र. एम एच १२ आर एफ ८२०६ मधुन बाजीराव नागरगोजे आणि शुभम भुजबळ यांनी LG कंपनीतुन आलो असल्याचे सांगत त्या दोघांना गाडीत बसवत ढोकसांगवी गावात पाचंगेवस्ती येथील खोलीवर नेले. तुमची राहण्याची व्यवस्था या ठिकाणी केली असल्याचे सांगत LG कंपनीमध्ये नोकरीस लावण्यासाठी प्लेसमेंटची प्रोसिजिंग फि म्हणुन प्रत्येकी २३००/ रु. रोख घेतले आणि संध्याकाळी तुमची नाईट ड्युटी असुन तुम्हाला MIDC मधील एअरकॉन कंपनी मध्ये आठ दिवस ट्रेनिंग आहे. त्यानंतर एल. जी. कंपनीमध्ये नोकरीस लावण्यात येईल असे सांगितले.
परंतु आठ दिवसानंतरही फिर्यादी आणि त्याच्या मित्राला LG मध्ये नोकरी न मिळाल्याने त्यांनी रुममध्ये राहणाऱ्या इतर कामगारांकडे चौकशी केली असता बाजीराव नागरगोजे आणि शुभम भुजबळ यांनी अजुन ७ युवकांकडुन प्रत्येकी २३०० रुपये घेऊन त्यांनाही LG कंपनीच्या नावाखाली वेगवेगळ्या कंपनीत कॉन्ट्रॅक्ट मध्ये कामाला लावले असल्याचे समजले. त्यानंतर फिर्यादी वैभव फुसाटे याने फसवणुक झालेल्या सर्व जणांना सोबत घेऊन बाजीराव नागरगोजे आणि शुभम भुजबळ यांच्याकडे २० दिवसांचा पगार आणि घेतलेले २३०० रुपये परत देण्याची मागणी केली. त्यावेळी बाजीराव नागरगोजे म्हणाला, "एल. जी. कंपनीमधील नोकरीची जाहिरात लावण्याचे काम आमचे मालक विशाल चोपडे हे त्यांच्या पुणे येथील ऑफिसमधुन करत असतात. आम्ही फक्त त्यांच्या सांगण्याप्रमाणेज्या कंपनीमध्ये कॉन्ट्रॅक्टमध्ये कामगारांची गरज असेल त्या ठिकाणी तुम्हाला कामाला लावतो.
परंतु फिर्यादी व इतर ८ कामगारांनी तुम्ही आमची LG कंपनीत कामाला लावतो असे खोटे सांगत आमची फसवणुक केली असुन आम्हाला आमचे पैसे परत द्या अशी मागणी केल्यानंतर बाजीराव नागरगोजे आणि शुभम भुजबळ यांनी सर्वांना शिवीगाळ करत फिर्यादी वैभव फुसाटे यास मारहाण केली. त्यानंतर त्याने रांजणगाव MIDC पोलीस ठाण्यात बाजीराव बाळु नागरगोजे, शुभम अरुण भुजबळ आणि विशाल चोपडे या तिघांच्या विरोधात नऊ जणांची एकुण १ लाख १७ हजार रुपयांची आर्थिक फसवणुक केल्याप्रकरणी फिर्याद दाखल केली आहे. रांजणगाव एम आय डी सी पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार विलास आंबेकर, ब्रम्हा पोवार पोलीस कॉन्स्टेबल रघुनाथ हलनोर, वळेकर यांनी तात्काळ हालचाल करत यातील दोन आरोपींना अटक केली असुन रांजणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुहास रोकडे पुढील तपास करत आहेत.
COMMENTS