आरोग्य टिप्स : स्वतःची काळजी घेणे आणि जीवनात जास्तीत जास्त आनंद मिळविणे महत्वाचे आहे. आजच्या तणावपूर्ण दैनंदिन जीवनात मानसिक आरोग्य महत्वा...
आरोग्य टिप्स : स्वतःची काळजी घेणे आणि जीवनात जास्तीत जास्त आनंद मिळविणे महत्वाचे आहे. आजच्या तणावपूर्ण दैनंदिन जीवनात मानसिक आरोग्य महत्वाचे ठरत आहे. आपल्या जीवनात साधे बदल केल्याने आपले मानसिक आरोग्य कसे चांगले राहील याचे काही व्यावहारिक मार्ग सांगितले आहेत. ते आजपासूनच अंमलात आणा म्हणजे तुम्ही चिरतरुण आणि आनंदी राहाल.
आपल्या भावना व्यक्त करा.
आपल्या भावनांबद्दल
बोलल्याने आपण चांगले मानसिक आरोग्य टिकवून ठेवू शकता. जेव्हाही तुम्ही अस्वस्थ
होता त्यावेळी तुम्ही हे आपल्या जिवलग मित्रास किंवा आपल्या पती / पत्नीस बोलून
दाखवा. त्याने मनावरचा भार अनेक अंशी कमी होतो.
व्यायाम करा
तज्ज्ञांचा असा दावा
आहे की व्यायाम केल्याने आपल्या मेंदूमध्ये अशी रसायने बाहेर पडतात ज्याने
आपल्याला बरे वाटेल. नियमित व्यायामामुळे तुमचा कॉन्फीडन्स वाढतो, मन आणि बुद्धी एकाग्र होते तसेच
झोपदेखील शांत लागते.
सदैव सक्रीय राहा.
आपल्यासाठी, आपल्या छंदासाठी वेळ काढा.
पार्कमध्ये थोडावेळ फिरणे, गार्डनिंग
करणे किंवा घरगुती कामात मन रामविल्याने आपल्या मनावरचा ताण भरपूर कमी होतो.
पौष्टिक आहार घ्या.
आपण काय खातो याच्याशी
आपल्या भावनांचा संबंध असल्याचे अनेक पुरावे आहेत. उदाहरणार्थ साखर आणि कॅफेन
यांचा त्वरीत परिणाम आपल्यावर होतांना दिसतो. म्हणून अन्नाचा आपल्या मानसिक
आरोग्यावर दीर्घकाळ प्रभाव पडत असतो. आपल्या मेंदूला निरोगी ठेवण्यासाठी आणि
आपल्या बाकी अवयावांना सशक्त ठेवण्यासाठी पोषक तत्वांचे मिश्रण आवश्यक आहे. म्हणून
पौष्टिक आहार घ्या. ज्याने आपला मेंदू सशक्त राहील.
मद्यपान करणे टाळा.
आपण आपला मूड
बदलण्यासाठी मद्यपान करतो. काही लोक कसल्यातरी भीतीमुळे किंवा एकटेपणामुळे मद्यपान
करतात. परंतु त्याचा परिणाम हा तात्पुरता असतो. ज्यावेळी आपले मद्यपान अचानक
थांबते त्यावेळी त्या व्यक्तीला डिप्रेशन येऊ शकते. त्याचा त्वरित वाईट परिणाम
दिसून येतो. अधून मधून हलके मद्यपान चांगले परंतु त्याचे व्यसन लागणे हे वाईट.
मित्रांना वेळ द्या.
मित्रांना भेटून बोला.
त्यांच्या सोबत थोडा वेळ घालवा. जर भेटून बोलता येत नसेल तर एखादा मेसेज किंवा
त्यांना फोन करा. त्यांच्यासोबतचा वेळ नेहमी आनंदी असतो. ज्याने मनावर फार ताण येत
नाही.
रुटीन मधून ब्रेक घेत जा
त्याच त्याच रुटीनचा
खूप कंटाळा येत असतो. त्यामुळेही आपले मन निरोगी राहत नाही. म्हणून कुठेतरी
फिरायला जाऊन या. रुटीनमधून थोडं बाहेर पडून वेगळे काहीतरी करून बघा.
COMMENTS