आरोग्य टिप्स : आजकाल सौंदर्यप्रसाधनांचा अती वापर आणि बदललेली जीवनशैली यामुळे अनेकजण वयापेक्षा मोठे दिसतात. वाढत्या वयाच्या खुणा लपविण्यासाठी...
आरोग्य टिप्स : आजकाल सौंदर्यप्रसाधनांचा अती वापर आणि बदललेली जीवनशैली यामुळे अनेकजण वयापेक्षा मोठे दिसतात. वाढत्या वयाच्या खुणा लपविण्यासाठी आणि तरुण दिसण्यासाठी खालील टिप्स फॉलो करा –
1.नियमित व्यायाम करा
नियमित
व्यायाम केल्याने रक्ताभिसरण वाढते मांसपेशी मजबूत होतात तसेच शरीराला एनर्जी
मिळाल्याने तुम्ही अधिक ऍक्टिव्ह राहता. परिणामी तुम्ही अधिक तरुण दिसता.
2.वॉकिंग
तुमच्या
चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी चालणं हा एक महत्वाचा व्यायाम आहे.
3.वेट लिफ्टिंग
वेट लिफ्टिंग
केल्याने शरीर अधिक मजबूत बनते. तसेच त्वचा अधिक तरुण दिसते.
4.स्क्वॅट्स
स्क्वॅट्स
हा व्यायाम प्रकार अँटीएजिंगसाठी खूप महत्वाचा आहे. यामुळे कॅलरीज बर्न होतात, शरीरात अनावश्यक चरबी साठत
नाही.
5.योगासन
विविध
प्रकारची योगासने केल्याने शरीर लवचिक बनते. योगासन केल्यामुळे शरीरामध्ये
रक्ताभिसरणाचा वेग वाढतो. त्वचा अधिक तरुण बनते.
फेस
योगा केल्यामुळे योग्य ब्लड सर्क्युलेशन होतं आणि तुमची त्वचादेखील टाईट होते.
6.प्राणायम
प्राणायम
केल्याने शरीरातील प्रत्येक मांसपेशीपर्यंत ऑक्सिजनचा पुरवठा होतो आणि शरीरातील
कार्बनडायऑक्साईडचे प्रमाण कमी होते. तसेच फुफ्फुसांची क्षमता आणि लवचिकता वाढते.
रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढल्याने सर्व इंद्रिये रिफ्रेश होतात. एकाग्रता
वाढण्यास मदत होते.तसेच चेहऱ्यावर तेज निर्माण होते.
COMMENTS