आरोग्य टिप्स : दूषित पाणी , अन्नातून विषारी पदार्थ पोटात गेल्यामुळे , जंतूसंसर्ग झाल्यामुळे पोटदुखी , जुलाबाचा (डायरिया) त्रास होऊ शकतो. हा ...
आरोग्य टिप्स : दूषित पाणी, अन्नातून विषारी पदार्थ पोटात गेल्यामुळे, जंतूसंसर्ग झाल्यामुळे पोटदुखी, जुलाबाचा (डायरिया) त्रास होऊ शकतो. हा फारसा गंभीर आजार नसला तरी यामुळे लगेच अशक्तपणा येतो. काही घरगुती उपायांच्या मदतीने या समस्येवर त्वरित मात करता येते. जाणून घ्या डायरियापासून त्वरित अराम मिळविण्यासाठी घरगुती उपाय –
आल्याचा चहा (Ginger tea)
आल्यामध्ये
असणाऱ्या अँटी बॅक्टेरिअल गुणधर्मामुळे डायरियापासून त्वरित आराम मिळतो. त्यामुळे
लूज मोशन झालं तर आल्याचा कोरा चहा प्यावा.
दही (Yoghurt)
पोटात
झालेलं इनफेक्शन कमी व्हावं यासाठी दही खावे. दह्यामुळे पोटातील जंतू नष्ट होतात
आणि पोटदुखीपासून आराम मिळतो. दह्यामध्ये थोडं मीठ, सैधव अथवा काळीमिरी पावडर
टाकून ते दिवसभरात दोन ते तीन वेळा खावे.
पुदिना आणि मध (Mint and
Honey)
एक
चमचा पुदिनाच्या रस, एक
चमचा मध आणि थोडं लिंबाचा रस एकत्र करा. सर्व मिश्रण कोमट पाण्यात मिसळून दिवसभरात
एक ते दोन वेळा प्या.
जिऱ्याचे पाणी (Cumin
Water)
जिऱ्यामुळे
तुमचे डिहायड्रेट झालेले शरीर लवकर रिकव्हर होतेच शिवाय यातील पोटॅशियममुळे शरीरात
संतुलित राहते. तसेच शरीराचे तापमान देखील वाढत नाही.
एक
ग्लास पाण्यात एक चमचा जिरे भाजून टाका. ते पाणी उकळून थंड झाल्यावर गाळून घ्या
आणि थोड्या थोड्या वेळाने या पाण्याचे सेवन करावे.
केळी (Banana)
पिकलेले
अथवा कच्चे केळ खावे. यामुळे पोटातील आतड्यांमधील पाणी शोषून घेतले जातात आणि
त्वरित अराम मिळतो.
ताक (Buttermilk)
ताकामध्ये
तरल भरपूर प्रोबायोटिक्स असतात. यामुळे शरीराला लवकर आराम मिळतो.
थंड
ताकामध्ये सैधव आणि काळीमिरी पावडर टाकून पिल्याने जुलाब लवकर थांबतात.
नारळाचे पाणी (Coconut
Water)
नारळाच्या
पाण्यात इलेक्ट्रोलेट्स असतात. त्यातील पोटॅशिअम, सोडिअममुळे तुमच्या
शरीरातील इलेक्ट्रोलेट्सचा संतुलित कायम राहतो आणि पाण्याची झीज भरून निघते. नारळ
पाण्यामुळे इन्स्टंट एनर्जी मिळते आणि ताजेतवाने वाटते.
COMMENTS