सहसंपादक :- प्रा.प्रविण ताजणे ( सर ) जुन्नर तालुका पंचायत समितीने गौरविलेल्या नारायणगाव विभागातील गुणवंत शिक्षकांचा भव्य सत्कार समारंभ ओम ...
सहसंपादक :- प्रा.प्रविण ताजणे ( सर )
जुन्नर तालुका पंचायत समितीने गौरविलेल्या नारायणगाव विभागातील गुणवंत शिक्षकांचा भव्य सत्कार समारंभ ओम श्री साईराम शिक्षक प्रतिष्ठान नारायणगाव यांनी वसंत व्हीला सभागृहात आयोजित केला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी वर्धा जिल्हा परिषदचे उपशिक्षणाधिकारी माननीय संजयजी मेहेर होते.
कार्यक्रमास नारायणगाव पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक माननीय सुनील धनवे, जुन्नर तालुका पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी माननीय अनिता शिंदे, सानेगुरुजी कथामाला पुणे जिल्हाध्यक्ष माननीय बाळासाहेब कानडे ,महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे संपर्कप्रमुख व रोटरी क्लब नारायणगावचे अध्यक्ष मंगेश मेहेर, जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे माजी अध्यक्ष रविंद्र वाजगे, विद्यमान कार्याध्यक्ष सयाजी चिखले, जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे माजी सभापती सुनिल हाडवळे,ओम श्री साईराम शिक्षक प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरदराव शिंदे, रोटरी क्लब नारायणगाव हायवेचे माजी अध्यक्ष अंबादास वामन, बाळासाहेब गिलबिले, तालुका महिला आघाडी कोषाध्यक्षा उर्मिला वाजगे व विभागप्रमुख अंजली सोमवंशी आदि मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय संजयजी मेहेर, प्रमुख पाहुणे सनिल धनवे, अनिता शिदे व बाळासाहेब कानडे यांनी मनोगत व्यक्त केले. तर या प्रसंगी बाळासाहेब गायकवाड, निवृत्ती कामटकर, हेमलता राजगुरू, मनिषा कुऱ्हाडे, कविता बेलवटे,स्वाती मुळे, निलेश शेलार, ज्योती थोरात सुमन चिखले, लतिका कवडे,अनुजा नवले, अनिल शिंदे, अंबादास कौटे, कांचन इंदोरे, साईनाथ कनिंगध्वज, रत्ना ढेरंगे, आत्माराम हांडे, वर्षाराणी हांडे,संजय रणदिवे,अनिता ठिकेकर सीमा कवडे, शौकत पटेल, भारती पडवळ, सुरेखा वामन, आशा बहिरट, दिपाली भारती, भारती गायकर या गुणवंत शिक्षकांचा भेट वस्तू, भरजरी फेटा, शाल व सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे नियोजन रमाकांत कवडे ,मनोहर वायकर,संदीप थोरात,रियाज मोमीन,मिलिंद औटी, मनोहर भोसले, प्रदीप डोंगरे, रंगनाथ पवार, बाळासाहेब राजगुरू, जालिंदर ढगे,श्याम बटवाल, शांताराम डोंगरे, गणेश बिडवई, दत्तात्रय हांडे, शिवाजी माळी, बाळासाहेब शिंदे यांनी केले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन मुळे यांनी केले तर आभार दिनेश मेहेर यांनी मानले.
COMMENTS