पुणेः शांत, संयमी,अभ्यासू व्यक्तिमत्व, गुन्हेगारांवर जबर वचक असलेले तपास पथक (DB) प्रमुख व ATC प्रभारी अधिकारी असलेले भारती विद्यापीठ पोलि...
पुणेः शांत, संयमी,अभ्यासू व्यक्तिमत्व, गुन्हेगारांवर जबर वचक असलेले तपास पथक (DB) प्रमुख व ATC प्रभारी अधिकारी असलेले भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनचे सहा. पोलिस निरीक्षक वैभव आनंदराव गायकवाड यांना केंद्रीय गृहमंत्री यांचे उत्कृष्ट पोलिस प्रशिक्षक पदक मंजूर करून सन्मानित करण्यात आले.
भारती विद्यापीठ पोलिस पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेले पोलिस नाईक आकाश नारायण फासगे यांना उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलिस महासंचालक पदक नुकतेच जाहीर झाले आहे. विविध ठिकाणी नोकरी करत असताना विविध गुन्ह्यांचा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करून आरोपींना कायद्याचा धाक दाखवून शांतता सुव्यवस्था राखण्याचा, तसेच विविध गुन्ह्यांमध्ये सी डी आर प्लॅनिंग व आरोपींचे भक्कम पुरावे लोकेशन उपलब्ध करून तसेच प्रतिबंधात्मक कारवाई करून, समाजामध्ये शांतता, सुव्यवस्था राखली जावी व आपल्या भागातील गुन्हेगारी संपवण्याचा चंगच मनाशी बांधून भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनचे सहा. पोलिस निरीक्षक वैभव गायकवाड नेहमी प्रयत्नशील असतात.
नवप्रविष्ट पोलिस प्रशिक्षणार्थींना अंतर वर्ग प्रशिक्षणाचे उत्कृष्ट प्रशिक्षण दिल्याबद्दल तसेच प्रशिक्षणार्थींच्या कला , क्रीडागुणांना वाव देऊन विवीध उपक्रमात सहभागी करून यशस्वी केले, त्याबद्दल सहाय्यक पोलिस निरीक्षक वैभव आनंदराव गायकवाड यांना केंद्रीय गृहमंत्री यांचे उत्कृष्ट पोलिस प्रशिक्षक पदक देऊन पुणे जिल्हाचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
तसेच कोंढवा येथे सेवेत असताना हिंदू मुस्लिम भाईचारा, शांतता सुव्यवस्था राखण्यासाठी, हिंदू मुस्लिम समाजातील लोकांमधे एकोपा, बंधुभाव निर्माण करून जातीय सलोखा निर्माण करून जातीय विषमता दुर करण्यासाठी पोलिस नाईक आकाश नारायण फासगे यांचे नाव आजही चर्चेत आहे. त्यांच्या या कार्यकर्तृत्वाची दखल घेउन त्यांना पोलिस महासंचालक पदक जाहीर करण्यात आले.
COMMENTS