लातूर : लातूरमध्ये जुळ्या भावांपैकी एकाचा सहा महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. याचाच फायदा घेत भावाच्याच पत्नीवर दोघांनी अत्याचार केल्याची ...
लातूर : लातूरमध्ये जुळ्या भावांपैकी एकाचा सहा महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. याचाच फायदा घेत भावाच्याच पत्नीवर दोघांनी अत्याचार केल्याची संतापजनक घटना रिंगरोड परिसरात घडली आहे.
दोन्ही जुळ्या
भावांमध्ये खूपच साम्य होते. याचाच फायदा घेत भावाच्याच पत्नीवर दोघांनी अत्याचार
केला. याप्रकरणी पती, दीर, सासू आणि
सासऱ्याविरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर
पोलिसांनी पीडितेचा पती आणि दिराला अटक केली असून, पोलिस पुढील
तपास करत आहेत.
पोलिसांनी
दिलेल्या माहितीनुसार, दोन जुळ्या भावातील एकाचे सहा महिन्यांपूर्वी
लग्न झाले होते. या दोन्ही जुळ्या भावांमध्ये खूपच साम्य होते. त्यामुळे घरातील
नवविवाहित मुलीला आपला नवरा आणि दीर कोण आहे ते यातील फरकच कळला नाही. याचाच फायदा
दिराने घेतला. जुळे असल्याचा फायदा घेत दिराने भावजयीवरच अत्याचार केला. धक्कादायक
म्हणजे सहा महिन्यांनी पीडितेच्या हा प्रकार लक्षात आला.
पीडित महिला
माहेरी गेली होती. यावेळी तिचा जुळा दीर घ्यायला गेला असता तिने सासरी जाण्यास
नकार दिला. यानंतर तिला तिच्या आई वडिलांनी सासरी नांदायला न जाण्याचे कारण
विचारले. यावेळी तिने आपल्या आईवडिलांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. यानंतर
तिच्या आईवडिलांना धक्काच बसला.
COMMENTS