पुणेः तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकण्यावरुन झालेल्या वादातून पेट्रोल पंपावरील कामगाराला मारहाण केली. शिवाय, फ...
पुणेः तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकण्यावरुन झालेल्या वादातून पेट्रोल पंपावरील कामगाराला मारहाण केली. शिवाय, फायर बॉटल कामगाराच्या डोक्यात मारल्याची घटना घडली असल्याने प्रवीण संतोष जाधव व विकास कोल्हे या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
तळेगाव ढमढेरे येथील एन पी पेट्रोल पंप येथे शिवरुद्र मुरकुटे व हरीओम राठोड हे दोघे पेट्रोल भरण्याचे काम करतात. प्रवीण जाधव व विकास कोल्हे हे दोघे तेथे आले, त्यांनी आमच्या गाडीमध्ये अर्जंट पेट्रोल टाक... असे म्हणून वाद घातला. यावेळी आलेल्या दोघांनी पेट्रोल पंप कामगारांनी लगेचच पेट्रोल भरले नाही म्हणून कामगारांना शिवीगाळ, दमदाटी करत हाताने मारहाण केली. यावेळी दोघांनी हरीओम राठोड या कामगाराच्या डोक्यात पेट्रोल पंपावर आज विझविण्यासाठी असेलला फायर बॉटल मारुन त्याला जखमी केले. यावेळी झालेल्या मारहाणीत हरीओम श्रीचंद राठोड (वय १९ वर्षे रा. मांडवा ता. सिरोड जि. वाशीम) हा जखमी झाला आहे.
याबाबत शिवरुद्र मारुती मुरकुटे (वय २० वर्षे रा. तळेगाव ढमढेरे ता. शिरुर जि. पुणे मुळ रा. वडगाव दादाहरी ता. परळी जि. बीड) यांनी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. शिक्रापूर पोलिसांनी प्रवीण संतोष जाधव व विकास कोल्हे (दोघे रा. तळेगाव ढमढेरे ता. शिरुर जि. पुणे) या दोघांवर गुन्हे दाखल केले आहेत. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक सागर कोंढाळकर हे करत आहेत.
COMMENTS