सहसंपादक :- प्रा.प्रविण ताजणे ( सर ) क्राईमनामा Live : जुन्नर तालुका विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष व ग्रामोन्नती मंडळ नारायणगावच्या गुरुव...
सहसंपादक :- प्रा.प्रविण ताजणे ( सर )
क्राईमनामा Live : जुन्नर तालुका विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष व ग्रामोन्नती मंडळ नारायणगावच्या गुरुवर्य रा. प. सबनीस विद्यामंदिरातील ज्येष्ठ विज्ञान शिक्षक रतीलाल बाबेल यांनी आवर्तसारणीतील 33 मूलद्रव्यांची माहिती कविता रूपाने "कविता मुलद्रव्याची" या काव्यसंग्रहात उत्तम मांडणी केली असून या काव्यसंग्रहाला चार आंतरराष्ट्रीय, दोन राष्ट्रीय व एक राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल नवकार भिशी ग्रुप, नारायणगाव यांच्या वतीने पुर्ण पोषाख तसेच भारताचे 11 वे राष्ट्रपती मिसाईल मॅन डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचा अर्धाकृती छोटा पुतळा देऊन सन्मान केला अशी माहिती सौ.भारती मुथ्था व सौ.मंजुषा चोरडिया यांनी दिली .
सत्काराला उत्तर देताना रतिलाल बाबेल म्हणाले की सत्कारामुळे प्रेरणा आणि ऊर्जा मिळते. आपल्याच बांधवांनी केलेला सन्मान हा घरचा सन्मान असून तो श्रेष्ठच असतो.
सद्गुरूंचे कृपा आशीर्वाद,
आई वडील व मोठ्यांचे आशीर्वाद व इतर सर्व जणांचा स्नेहभाव यामुळे हे शक्य होते आणि वेगळे काहीतरी करण्याची ऊर्जा निर्माण होते .आपण केलेल्या कार्याचा ज्यावेळी समाज बांधवांकडून सत्कार होतो, त्यावेळेला व्यक्ती निःशब्द होतो ,ऊर भरून येतो, मनामध्ये कृतज्ञतेचे भाव जागे होऊन हात जोडले जातात आणि मस्तक नतमस्तक होते.आपोआप माझे तसेच झाले. सर्वांनी केलेले गोड कौतुक, शुभेच्छा आणि भेटवस्तू स्वीकारून परत आल्यानंतरही आठवणीतच रममाण रहावे असे वाटत राहते. पुढील काळातही आपणा सर्वांकडून असेच भरभरून प्रेम मिळावे हीच अंतःकरणपूर्वक अपेक्षा.
यावेळी श्री व सौ.मंजुषा चोरडिया, श्री व सौ.भारती मुथ्था, श्री व सौ.मोनिका गुंदेचा, श्री व सौ.योगिता मुथ्था,श्रीमती माया मुथ्था, श्री व सौ.भारती चोरडिया, श्री व सौ.उज्वला कर्णावट, श्री व सौ.वैशाली चोरडिया, श्रीमती संगीता कटारिया, सौ.अक्षदा बाबेल यांनी शुभेच्छा देताना या वेगळ्या संकल्पनेबद्दल कौतुक करून लवकरच दुसरी आवृत्ती तसेच पुढील कवितासंग्रह यावे व आणखी आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त व्हावेत अशा भरभरून शुभेच्छा दिल्या.
COMMENTS