भोपाळ (मध्य प्रदेश): एका 11 वर्षीय एचआयव्ही बाधित मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना महेश्वर (जि. खरगोन) येथे घडली आहे. बलात्कारादरम्...
भोपाळ (मध्य प्रदेश): एका 11 वर्षीय एचआयव्ही बाधित मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना महेश्वर (जि. खरगोन) येथे घडली आहे. बलात्कारादरम्यान पीडितेचे गुप्तांग फाटले आहे.
शरीरातून मल बाहेर काढण्यासाठी पोटात छिद्र केले आहे.
वेदनेने विव्हळत असणाऱ्या मुलीला काही दिवसांपूर्वी इंदूरला आणले. येथे तिच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र, उपचारासाठी पैसे नाहीत. आता घर विकून ऑपरेशन करावे लागेल, असे कुटुंबीयांनी सांगितले.
प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, 'मुलगी घरात एकटी होती. यावेळी आरोपी दीपक यादव (वय 34) घरात घुसला आणि मुलीवर बलात्कार केला. कोणाला न सांगण्याच्या अटीवर धमकी ही दिली. कुटुंबीय घरी आल्यानंतर पीडितेने घडलेला प्रकार सांगितला. पीडितेचे गुप्तांग फाटले होते. शिवाय, खूप रक्त वाहिल होते, हे दृष्य पाहून कुटुंबियांना धक्का बसला. कुटुंबीयांनी पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनीही तक्रार दाबण्यासाठी धमकी दिली. शेवटी प्रयत्न करून तक्रार दाखल झाली. आरोपीची तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे.
दरम्यान, पीडित मुलीच्या कुटुंबियांची आर्थिक परिस्थिती अतिषय बिकट आहे. मुलीच्या आजारामुळे कुटुंबावर संकट कोसळले आहे. त्यात मुलीवर बलात्कार झाल्यामुळे त्यांच्या संकटात अधिक वाढ झाली आहे.
COMMENTS