पुणेः पिंपळे जगताप (ता. शिरूर) येथील भारत गॅस कंपनीसमोर किरकोळ वादातून सख्या भावाने मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली आहे शिक्रापूर पोलि...
पुणेः पिंपळे जगताप (ता. शिरूर) येथील भारत गॅस कंपनीसमोर किरकोळ वादातून सख्या भावाने मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली आहे शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे कडाजी दिगंबर कांबळे याच्यावर गुन्हे दाखल केले आहेत.
पिंपळे जगताप (ता. शिरुर) येथील भारत गॅस कंपनीसमोर असलेल्या डेअरी मध्ये लखन कांबळे हे असताना त्यांचा भाऊ कडाजी कांबळे तेथे आला आणि लखन यांना तू तुझ्या मुलाला गावाला सोडून ये... तू त्याला नीट सांभाळू शकत नाही, असे म्हणाला. यावेळी लखन यांनी तू आमच्यात लक्ष घालू नकोस असे म्हटले असता कडाजी याने शिवीगाळ, दमदाटी करत हाताने मारहाण करण्यास सुरवात केली. याच वेळी शेजारी पडलेला दगडाने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. यामध्ये लखन कांबळे हे जखमी झाले आहेत.
याबाबत लखन दिगंबर कांबळे (वय २९ वर्षे रा. बालाजीनगर चाकण ता. खेड जि. पुणे मूळ रा. केळगाव ता. निलंगा जि. लातूर) यांनी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. शिक्रापूर पोलिसांनी कडाजी दिगंबर कांबळे (रा. आळेफाटा जि. पुणे मूळ रा. केळगाव ता. निलंगा जि. लातूर) याच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार अमोल चव्हाण हे करत आहेत.
COMMENTS