प्रतिनिधी : गणेश गाडगे. क्राईमनामा Live : मा.तज्ञ संचालक विविध कार्य सेवा सोसायटी निमगाव सावा व बैलाचे प्रसिद्ध व्यापारी स्व. विठ्ठल बाबुराव...
प्रतिनिधी : गणेश गाडगे.
क्राईमनामा Live : मा.तज्ञ संचालक विविध कार्य सेवा सोसायटी निमगाव सावा व बैलाचे प्रसिद्ध व्यापारी स्व. विठ्ठल बाबुराव गाडगे (बागवाडी )यांच्या दशक्रियेच्या विधी प्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते निमगांव सावा येथे स्व . विठ्ठल बाबुराव गाडगे यांच्या दशक्रिये प्रसंगी अनेक मान्य वर उपस्थित होते. त्यामध्ये श्री. पाडुरंगजी पवार साहेब, भास्करशेठ गाडगे, वल्लभ शेळके सर ( राजुरी ), दत्ता गाडगे, विकास चव्हाण ( पारगांव ), विजय गाडगे, आनंदा बेलकर (पेमदरा), सचिन भोजने (व्याख्याते ), चंद्रकांत जावळे गुरुजी, डॉ रामदास गाडगे यांनी भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण केली व ज्ञानेश्वरीचे पुजन ह.भ. प. पंढरी महाराज डुकरे यांनी केले या कुटुंबात असणाऱ्या दोन्ही मुलांनी सुनिल गाडगे ( मा . सैनिक ) व गणेश गाडगे ( होमगार्ड ) यांनी वडिलांसाठी खुप मेहनत घेतली मात्र शेवटी अचानक हृदय विकाराच्या झटक्याने त्यांचे दुःखद निधन झाले. वडिलांची इच्छा होती माझी दोन्ही मुले सरकारी सेवेत असावी ही इच्छा मुलांनी पुर्ण केली व दोन्ही मुलांनी वडिलांच्या स्मरणार्थ पंडित नेहरू विद्यालय या नुतन इमारती साठी ५१ हजार रुपये देण्याचे ठरवले व जि. प शाळा बागवाडी शाळेसाठी ५ हजार रुपये अशी ठेव ठेवण्यात आली. दशक्रिये प्रसंगी ह .भ. प . विजय महाराज खाडे निमगांव सावा यांचे प्रवचन झाले
COMMENTS