नवी दिल्लीः बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ताच्या मोटारीचा ब्रेक फेल झाल्यामुळे अपघात झाला. या अपघातात तनुश्रीच्या पायाला गंभीर दुखापत झाली ...
नवी दिल्लीः बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ताच्या मोटारीचा ब्रेक फेल झाल्यामुळे अपघात झाला. या अपघातात तनुश्रीच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. महाकालच्या दर्शनासाठी जात असताना हा अपघात झाला आहे, याबाबतची माहिती तनुश्री दत्ता हिने पोस्ट लिहून दिली आहे.
एकेकाळी बॉलिवूडमध्ये आपल्या ग्लॅमरस अभिनयासाठी अभिनेत्री तनुश्री दत्ता ओळखली जात होती. अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून अपघाताची बातमी दिली आहे. तनुश्रीचा महाकालच्या दर्शनासाठी जात असताना गाडीचे ब्रेक फेल झाल्यामुळे तिचा अपघात झाला. फोटो शेअर करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले: 'आजचा दिवस साहसांनी भरलेला होता, शेवटी महाकालाच्या दर्शनासाठी पोहोचले. मंदिराकडे जाताना विचित्र अपघात झाला. ब्रेक फेल झाल्याने कारला धडकली, काही टाके पडले. जय श्री महाकाल.'
https://www.instagram.com/p/CdD3hwFlYsm/?utm_source=ig_web_copy_link
दरम्यान, अभिनेत्री तनुश्री दत्ताच्या पायाला दुखापत झाली आहे, संबंधित फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
COMMENTS