पुणेः टाकळी भीमा (ता. शिरुर) येथील घोलपवाडी येथे एका युवकाने दारु पिण्यास पैसे दिले नाही म्हणून हातोडीने मारहाण केल्याची घटना घडली आहे. शि...
पुणेः टाकळी भीमा (ता. शिरुर) येथील घोलपवाडी येथे एका युवकाने दारु पिण्यास पैसे दिले नाही म्हणून हातोडीने मारहाण केल्याची घटना घडली आहे. शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे अनिकेत रामदास घोलप या युवकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
टाकळी भीमा (ता. शिरुर) येथील घोलपवाडी मध्ये असलेल्या ज्ञानराज ॲटो गॅरेज येथे गौरव येळे हा असताना तेथे अनिकेत घोलप आला त्याने गौरवकडे दारु पिण्यासाठी पैसे मागितले. गौरव याने मी तुला दारु पिण्यासाठी पैसे देऊ शकत नाही, असे म्हटले असता दोघांमध्ये वाद झाला. त्यावेळी अनिकेत याने गौरवला शिवीगाळ, दमदाटी करत गॅरेज मध्ये असलेला हातोडा घेऊन मारहाण केली. यामध्ये गौरव जखमी झाला आहे.
याबाबत गौरव भानुदास येळे (वय १९ वर्षे रा. येळेवस्ती पारोडी ता. शिरुर जि. पुणे) याने शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. शिक्रापूर पोलिसांनी अनिकेत रामदास घोलप (रा. टाकळी भीमा घोलपवाडी ता. शिरुर जि. पुणे) याच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार अमोल चव्हाण हे करत आहेत.
COMMENTS