सहसंपादक : प्रा.प्रविण ताजणे ( सर ) क्राईमनामा Live : गौरीशंकर सामाजिक प्रतिष्ठाण च्या वतीने मा.श्री.संदीपभाऊ दिलीपशेठ ताजणे यांच्या वाढद...
सहसंपादक : प्रा.प्रविण ताजणे ( सर )
क्राईमनामा Live : गौरीशंकर सामाजिक प्रतिष्ठाण च्या वतीने मा.श्री.संदीपभाऊ दिलीपशेठ ताजणे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत ई-श्रम कार्ड नोंदणी शिबीराचे आयोजन दि.२९एप्रिल२०२२ ते दि.१मे२०२२ रोजी करण्यात आले होते. शिबिराचे उदघाटन जुन्नर नगरीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष शामभाऊ पांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.
यावेळी उपनगराध्यक्ष दिपेशभैया परदेशी, गटनेते समीर भगत, उपतालुकाप्रमुख अविनाश करडिले, शहरप्रमुख चंद्रकांत डोके, नगरसेविका सुवर्णाताई बनकर, जेष्ठ मार्गदर्शक बळीराम थोरात, विठ्ठलवाडी वडजचे सरपंच आदिनाथशेठ चव्हाण, आतार सर, राहुलजी दातखिळे व जुन्नर शहरातील विविध भागांतील युवक व नागरिक उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी या सामाजिक उपक्रमास शुभेच्छा दिल्या. शहरातील ३९६ गरजूंनी या शिबिरात आपला सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जितेंद्र पुराणिक यांनी केले.
COMMENTS